मराठा आरक्षणासंदर्भात समाजातील मते जाणून घेण्यासाठी विखे यांनी काढलेल्या दोनदिवसीय दौऱ्याचा समारोप मंगळवारी, (दि. ८) येवल्यातील बैठकीने झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. शरद पवारांना आरक्षण देण्यापासून रोखले कुणी, असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्र्यांनी इतर पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन पंतप्रधानांची भेट घेण्यास जायला हवे होते. संभाजी महाराजांना आपण विनंती करणार असून, समाजाने एका झेंड्याखाली यावे, भलेही नेतृत्व तुम्ही करा, असेही विखे यावेळी म्हणाले.
छगन भुजबळ हे आता फक्त समता परिषद आणि मागासवर्गीय समाजापुरते मर्यादित नेतृत्व राहिलेले नसून ते या मतदारसंघातील सर्व समाजाचे नेतृत्व आहे. भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले पाहिजे. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका घेत आता भुजबळ यांनी सगळ्या समाजाचे नेतृत्व केले पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी यावेळी केली. यावेळी संजय सोमासे, दीपक मढवई, चंद्रमोहन मोरे, तुकाराम देवढे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आनंद शिंदे, प्रा. नानासाहेब लहरे यांनी केले. नंदकिशोर शिंदे यांनी आभार मानले.
बैठकीस खासदार डॉ. भारती पवार, कापसे पैठणी उद्योग समूहाचे बाळासाहेब कापसे, डॉ. एस. के. पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष केदार आहेर, बाबा डमाळे, नगरसेवक प्रवीण बनकर, प्रमोद सस्कर, आनंद शिंदे, संजय सोमासे, राजेंद्र पवार, भाजप शहराध्यक्ष तरंग गुजराथी, अक्षय तांदळे, सुधाकर पाटोळे, संतोष काटे, गोरख पवार, सागर नाईकवाडे, संकेत जाधव, प्रवीण निकम, छगन दिवटे, रावसाहेब कोटमे, किरण लभडे, महेश पाटील, डॉ. गोविंद भोरकडे, युवराज पाटोळे, दीपक मढवई आदी उपस्थित होते.
फोटो- ०९ येवला विखे
===Photopath===
090621\09nsk_33_09062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०९ येवला विखे