शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रेल्वेतील हल्ल्याप्रकरणी अल्पवयीन मुलास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 12:20 AM

नाशिकरोड : गेल्या आठवड्यात रेल्वेत दोन चहा विक्रेत्यांवर वर्चस्वाच्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्या नाशिकरोड येथील भालेराव मळ्यातील मुलाला नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी अटक केली. तो अल्पवयीन असल्याने मनमाडमधील अभिरक्षणगृहात दाखल करण्यात आले असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती प्रभारी अधिकारी विष्णू भोये यांनी दिली.

ठळक मुद्देचहा विक्रेत्यावर या संशयिताने साथीदारांसह रेल्वे प्रवासात चाकूने वार.

नाशिकरोड : गेल्या आठवड्यात रेल्वेत दोन चहा विक्रेत्यांवर वर्चस्वाच्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्या नाशिकरोड येथील भालेराव मळ्यातील मुलाला नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी अटक केली. तो अल्पवयीन असल्याने मनमाडमधील अभिरक्षणगृहात दाखल करण्यात आले असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती प्रभारी अधिकारी विष्णू भोये यांनी दिली.अमनसिंह चौव्हाण व पवनकुमार शिवप्रसाद या चहा विक्रेत्यावर या संशयिताने साथीदारांसह रेल्वे प्रवासात चाकूने वर केले होते. हल्लेखोर चालत्या गाडीची चेन ओढून देवळाली स्थानकाजवळ उतरून फरार झाले होते. मुख्य संशयित अल्पवयीन नाशिकरोड रेल्वे पार्किंग येथे येणार असल्याची खबर गुन्हे पथकाला मिळाली होती. हवालदार संतोष उफाडे, महेश सावंत, चंद्रभान उबाळे, विजय कपिले, महेश सावंत, सहायक निरीक्षक पंढरीनाथ मगर, भुसावळ आरपीएफचे कैलास बोडके तपास करत होते. हा संशयित पार्किंगमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच संतोष उफाडे व सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, प्रभारी अधिकारी विष्णू भोये यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक केली. रेल्वेतील वर्चस्ववादातून फिर्यादींशी हल्लेखोरांचे वाद झाले होते. त्यातूनच हा हल्ला झाला होता.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी