नाशिक : बारा वर्षीय शाळकरी मुलीचा जिल्हा व सत्र न्यायालयासमोरविनयभंग करणारा आरोपी राजेंद्र एकनाथ वाघमारे (३४, रा. वाढोली, खंबाला, ता. त्र्यंबकेश्वर) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी बुधवारी (दि़ २४) तीन वर्षे सक्तमजुरी, एक हजार पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली़ न्यायालयाने अवघ्या चार महिन्यांत या खटल्यात निकाल दिला असून, अल्पवयीन मुलीने दाखविलेल्या हिमतीचे कौतुक करून अन्यायाविरोधात मुलींनी पुढे येणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे़प्रधान न्यायाधीश शिंदे यांच्यासमोर सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील शिरीष कडवे यांनी न्यायालयात पीडित मुलीसह आठ साक्षीदार तपासून परिस्थितीजन्य पुरावे सादर केले़ यावरून आरोपी वाघमारेस दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ सरकारवाडा पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केल्यानंतर या खटल्याचा निकाल दिला आहे़२९ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शाळकरी मुलगी जिल्हा न्यायालयासमोरून पायी जात होती़ यावेळी असलेला आरोपी राजेंद्र वाघमारे याने या मुलीचा विनयभंग केला़ पीडित मुलीने हा प्रकार न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या चहाविक्रेत्यास सांगितल्यानंतर त्याने आरडाओरड करीत पळून जाणाऱ्या वाघमारेला पाठलाग करून पकडले व न्यायालयातील पोलिसांच्या हवाली केले होते़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़
अल्पवयीन मुलगी विनयभंग प्रकरणी सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:49 PM
बारा वर्षीय शाळकरी मुलीचा जिल्हा व सत्र न्यायालयासमोर विनयभंग करणारा आरोपी राजेंद्र एकनाथ वाघमारे (३४, रा. वाढोली, खंबाला, ता. त्र्यंबकेश्वर) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी बुधवारी (दि़ २४) तीन वर्षे सक्तमजुरी, एक हजार पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली़ न्यायालयाने अवघ्या चार महिन्यांत या खटल्यात निकाल दिला असून, अल्पवयीन मुलीने दाखविलेल्या हिमतीचे कौतुक करून अन्यायाविरोधात मुलींनी पुढे येणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे़
ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालय : अवघ्या चार महिन्यांत निकाल