लासलगाव : निफाड तालुक्यातील पालखेड येथील सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा विनयभंग करीत लैंगिक छळ केल्याचे आरोपावरून भारत भिमा कडाळे (२७ रा.पालखेड) यास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच अकरा हजार रूपये दंडाची शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी सुनावली असून सदर दंडापैकी दहा हजार रूपये पिडीत युवतीस देण्याचे आदेश दिले आहेत.पालखेड येथे दि.३ मे २०१३ रोजी सोळा वर्षीय पिडीत अल्पवयीन युवती दुपारी तिच्या लहान बहीणीसह रस्त्याने घरी जात असतांना आरोपी भारत भिमा कडाळे याने लज्जास्पद भाषा वापरली व तिचा हात पकडला असता त्याला हिसका देवून युवती घरी परतली. या प्रकरणी त्याच्या आईकडे युवतीच्या आई व काकाने तक्रार केली असता परत आरोपी भारत कडाळे याने युवतीची छेड काढीत व लैंगिक छळ केला व घरातील सर्वांना ठार मारून टाकु अशी धमकी दिली.त्यानंतर त्वरीत पिडीतेने विनयभंग केल्याची पिंपळगाव (ब) पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. पोलीस उपनिरिक्षक एम. बी. जोगन यांनी आरोपीवर कारवाई करीत त्याला ताब्यात घेतले व तपास करून आरोपींविरु ध्द निफाड न्यायालयात जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता.या खटल्याचे कामकाजात सरकार पक्षातर्फे एकुण सात साक्षीदारांची साक्ष सहायक जिल्हा सरकारी विकल अॅड रमेश कापसे यांनी नोंदविली. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी आरोपी भारत डगळे यास तीन वर्षे सश्रम कारावास व ११००० रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली.या खटल्यात तपासी अधिकारी म्हणुन पोलिस हवालदार व्हि. आर. वेलजाळी यांनी कामकाज पाहिले. सदर खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. रमेश कापसे यांनी काम पाहीले.
अल्पवयीन युवतीचा विनयभंग प्रकरणी तीन वर्षे कारावास अन् दंडाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 6:20 PM
लासलगाव : निफाड तालुक्यातील पालखेड येथील सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा विनयभंग करीत लैंगिक छळ केल्याचे आरोपावरून भारत भिमा कडाळे (२७ रा.पालखेड) यास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच अकरा हजार रूपये दंडाची शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी सुनावली असून सदर दंडापैकी दहा हजार रूपये पिडीत युवतीस देण्याचे आदेश दिले आहेत.
ठळक मुद्दे घरातील सर्वांना ठार मारून टाकु अशी धमकी दिली