नाशिक : एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत दोघा टवाळखोरांनी मागील दोन वर्षापासून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी, आर्यन पाटील (रा. बदलापूर, ठाणे) व विशाल चौधरी (एसटी वर्कशॉपसमोर, पेठरोड) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पिडीतेने दिलेल्या तक्र ारीनुसार जानेवारी २०१८ पासून आर्यन या संशयिताने तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आक्षेपार्ह फोटो काढत संबंध ठेवण्याच्या धमक्या दिल्या. याचा गैरफायदा घेत विशाल याने आर्यनसोबतचे तुझे संबंध घरी सांगेल अशी धमकी देत त्यानेही पिडीतेसोबत आक्षेपार्ह फोटो काढून घेतले. यानंतर विशालने तिचे काढलेले फोटो कुटुंबियांना दाखवेल अशी धमकी देत वेळोवेळी विनयभंग केला. या प्रकरणी दोघांविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डीजीपीनगरला घरफोडी ४८हजारांची रोकड गायबनाशिक : बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून ४८ हजार रूपयांची रोकड व साहित्य चोरून नेल्याची घटना अंबड पोलीस ठाणे हद्दीतील कृष्णानगर- डीजीपीनगर येथे गुरूवारी (दि.८) दुपारी घडली. याप्रकरणी करसन रूगनाथराम चौधरी (रा. कृष्णानगर, मुळ राज्यस्थान) यांनी तक्र ार दाखल केली आहे. चौधरी कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलुप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील ३४ हजार रूपयांची रोकड व १४ हजार रूपयांचे दागिने असा ४८ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारखान्यातून १ लाखाची रोकड गायबनाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील पोलिपॅक इंडस्ट्रीज या कंपनीचे कुलुप तोडून चोरट्यांनी कार्यालयातून ७ लाख रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.७) मध्यरात्री घडली.याप्रकरणी अरूण राधेश्याम केडिया (रा. अश्विनगर, नवीन नाशिक) यांनी तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कंपनी कार्यालयातील टेबलच्या खनात ठेवलेले १ लाखाची रोकड घेऊन पलायन केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टोळी युद्धातून एकास जीवे मारण्याचा प्रयत्ननाशिक : टोळीचे वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नातून एका टोळक्याने युवकास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शुक्र वारी (दि.९) रात्री दिंडोरी रोडच्या मार्केट यार्ड परिसरात घडला. गणेश झुंबर आहेर, सागर गणपत बोडके, अक्षय आकाश आहेर, विनोद गुंजाळ (रा. सर्व फुलेनगर, पंचवटी) अशी मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी जनार्धन लक्ष्मण काकड (२१, रा. तवली फाटा) याने तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार संशयितांनी त्यास मार्केट यार्ड येथे आडवून तु दुसºया टोळीसोबत राहतो, आमचा भाई सागर येलमाने जेलमधून सुटणार आहे. तुला पाहतो असे बोलून त्यास लाकडी दांडक्यांनी बेदम मारण केली. तसेच तेथे दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करत आहेत.गरवारे चौफुलीवर ट्रकचे टायर लंपासनाशिक : महामार्गाच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकचे तीन टायर चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार बुधवारी (दि.७) गरवारे पॉइंटजवळ घडली.गजानन रमेश्राव केने (३५) व विनोद प्रदिप केने (३० , रा. दोघेही बडनेरा एमआयडीसी, निंभोरा, अमरावती) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी निवृत्ती लक्ष्मण गोवर्धने (४५, रा. अंबड) यांनी तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार संशयितांनी मंगळवारी रात्री गरवारे पॉंईट जवळ महामार्गालगत उभ्या असलेल्या गोवर्धने यांच्या ट्रकचे मागील बाजुचे दोन व पुढील बाजुचा एक असे तीन टायर असे ५२ हजार रूपयांचे टायर लंपास केले आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.युवकाची आत्महत्यानाशिक : राहते घरी गळफास घेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना सातपूरच्या स्वारबाबानगर परिसरात शुक्र वारी (दि.९) सायंकाळी घडली.राहुल चंदर शिंदे (२१, रा. स्वरबाबानगर, जगतापवाडी, सातपूर) असे आत्महत्या करणाºया युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल याने राहत्या घरात छतास असलेल्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक आहेर करत आहेत.