मालेगाव : तालुक्यातील म्हाळदे शिवारात गौण खनिज चोरीप्रकरणी ८ जणांविरुद्ध पवारवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून ३ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस नाईक राकेश उबाळे यांनी फिर्याद दिली.
म्हाळदे शिवारातील अकरा हजार खोलीजवळ नदीपात्रात बैलगाडीच्या साह्याने अवैधरीत्या शासनाची कोणतीही परवानगी न घेता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बैलगाडीद्वारे दोन हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळूची वाहतूक करताना मिळून आले.
पोलिसांनी आरोपी मोहन दाजीबा माळी, अतिक मोहंमद फरीद मोहंमद, दीपक बाबूराव चौधरी, शेख इरफान शेख बुढन, अरशदखान अफजल खान, शेख फिरोज शेख समसुद्दीन, शेख बाबू शेख समसुद्दीन व मालक शेख रशीद शेख माजीद, सर्व रा. मालेगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना २ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १० बैल, ५० हजार रुपये किमतीच्या पाच बैलगाड्या, २० हजार रुपये किमतीची हीरोहोंडा दुचाकी क्र. एमएच १५ बीके २४६२, अर्धा ब्रास वाळू २ हजार रुपये किमतीची, २ हजार २०० रुपये किमतीचा लोखंडी फावडा, प्लास्टिकचे घमेले मिळून आले. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.