नाशिक : शाळा, कॉलेजामधील मुली, तरु णींना आपल्या प्रेमजालात फसवून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याचे वा काही प्रमाणात पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. लग्नाचे आमिष वा फूस लावून पळवून नेऊन त्यांच्याशी लग्न केल्यानंतर अत्याचार करणे, वाममार्गाला लावण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत़ विशेष म्हणजे पळून जाण्याच्या प्रकारांमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढ झाल्याचे चित्र आहे़ गत चार वर्षांत शहरातील २२१, तर ग्रामीणमधील ५६९ अल्पवयीनांनी पलायन केले असून, त्यामध्ये मुलीची संख्या ४७७ असल्याची माहिती पोलिसांनी माहिती अधिकारात दिली आहे़अल्पवयीन मुलांच्या पलायनाची विविध कारणे असली तरी या मुलांमध्ये १८ ते २५ या वयोगटातील तरुण-तरुणींची संख्या सर्वाधिक आहे़ या खालोखाल विवाहित स्त्री-पुरुषांची संख्या असून, शहरात गत चार वर्षांत १०९६ तरुण-पुरुष, तर १३५१ तरुणी-स्त्रिया, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७३० तरुण-पुरुष, तर ११६४ तरुणी-स्त्रियांनी पलायन केले आहे़ ग्रामीण भागातील मनमाड, नांदगाव, येवला व सिन्नर तालुक्यात पलायनाचे प्रमाण अधिक आहे़वाढते शहरीकरण तसेच एकत्रित कुटुंबपद्धती नाहीशी होत चालली असून चित्रपट, मोबाइल, विविध सोशल नेटवर्किंग साईट यामुळे मुले कुटुंबाहून अधिक वेळ मित्र-मैत्रिणी व मोबाइलमध्ये घालवितात़ अल्प काळातील मैत्रीवर विश्वास ठेवून मुली व मुले पळून जातात. त्यातील काही तरुणी काही दिवसानंतर पुन्हा पालकांकडे आल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा राहतो़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गत चार वर्षांत प्रेम प्रकरणे तसेच विवाहाचे आमिष दाखवून महिला व मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे़ अल्पवयीन अर्थात सोळा ते सतरा वयोगटातील मुला-मुलींची पलायनाची आकडेवारी चिंता करण्यासारखी आहे़ पलायनाच्या घटना पाल्यांच्या चुकीमुळे होतात असे नाही, तर त्यासाठी घरातील वातावरण, आई-वडिलांचे दुर्लक्ष, मुलांना मागेल ते आणून देणे, त्यांची हौस भागवणे, संस्कारांचा अभाव, इंटरनेट, मोबाइल, चॅटिंग आदी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे़
जिल्ह्यात अल्पवयीन ‘सैराट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:50 AM
शाळा, कॉलेजामधील मुली, तरु णींना आपल्या प्रेमजालात फसवून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याचे वा काही प्रमाणात पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. लग्नाचे आमिष वा फूस लावून पळवून नेऊन त्यांच्याशी लग्न केल्यानंतर अत्याचार करणे, वाममार्गाला लावण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत़ विशेष म्हणजे पळून जाण्याच्या प्रकारांमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढ झाल्याचे चित्र आहे़
ठळक मुद्देपळून जाण्याच्या प्रकारांमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढ मुलीची संख्या ४७७ अल्पवयीन मुलांच्या पलायनाची विविध कारणे