शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पूर्व प्रभाग सभापतिपदी मिर्झा

By admin | Published: May 21, 2017 1:29 AM

शनिवारी (दि. २0) झालेल्या प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा एकमेव अर्ज असल्याने पूर्व प्रभाग सभापतिपदी शाहीन मिर्झा यांची निवड झाली

 लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने भाजपाचाच सभापती होणार हे निश्चित झाले होते. शनिवारी (दि. २0) झालेल्या प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा एकमेव अर्ज असल्याने पूर्व प्रभाग सभापतिपदी शाहीन मिर्झा यांची बिनविरोध निवड झाली.मनपा पूर्व विभाग सभापतिपदाची निवडणूक शनिवारी (दि.२0) दुपारी ४ वाजता प्रभाग सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरसचिव अशोक वाघ, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. पूर्व विभागात पाच प्रभाग असून, यात प्रभाग १४, १५, १६, २३ व ३0 यांचा समावेश आहे. या पाच प्रभागातील १९ नगरसेवकांमध्ये भाजपाचे १२, राष्ट्रवादी ४, काँग्रेस २ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाचे नगरसेवकामध्ये सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, सुप्रिया खोडे, श्याम बडोदे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा, उपमहापौर प्रथमेश गिते, सुमन भालेराव, अनिल ताजनपुरे, अर्चना थोरात आदिंचा समावेश आहे. भाजपाकडून नवीन चेहऱ्यापैकी प्रथमेश गिते यांना उपमहापौर व श्याम बडोदे यांना स्थायी समितीवर संधी देण्यात आली. त्यामुळे सभापतीपदासाठी शाहीन मिर्झा यांना संधी देण्यात आली. शाहीन मिर्झा यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी जोतिबा पाटील यांनी मिर्झा यांची पूर्व प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड घोषित केली. यावेळी महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते मिर्झा यांचा सत्कार करण्यात आला.