शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

महिला बालकल्याणच्या निधीत गैरव्यवहार सीमंतिनी कोकाटे : कुपोषित बालकांची नावे लपविली जातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:47 AM

सिन्नर : शिवसरस्वती फाउण्डेशनच्या वतीने तालुकाभर कुपोषणावर काम सुरू असून, प्रशासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही.

सिन्नर : शिवसरस्वती फाउण्डेशनच्या वतीने तालुकाभर कुपोषणावर काम सुरू असून, प्रशासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्याचबरोबर अनेक अंगणवाड्यांवर अतिशय धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. प्रशासनाचा या सर्व बाबींकडे काणाडोळा होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केला आहे. तीव्र कुपोषित मुलांची नावे लपविली जात असल्याचे कोकाटे यांनी सांगितले़ यासंदर्भात संस्थेच्या अध्यक्ष सीमंतिनी माणिकराव कोकाटे यांनी गटविकास अधिकारी एन. के. वाणी यांची भेट घेऊन अनेक बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. दत्तक घेतलेल्या ६७ मुलांपैकी १८ मुले कुपोषणातून बाहेर आली असून, सॅममधील १३ मुलांपैकी ४ मुले मॅममध्ये, तर तिघांना दुर्धर आजार असल्याचे समोर आले. उन्हाळ्यात मुलांची योग्य ती काळजी न घेतली जात असल्याने अडचणी येत आहेत. या संदर्भात कोकाटे यांनी पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. महिला बालकल्याण विभागावर मोठ्या प्रमाणावर खर्च होणारा निधीत जर अशा प्रकारे गैरव्यवहार होत असेल तर प्रशासनाला कुणाची कवच कुंडले आहेत, असा सवाल उपस्थित करत कोकाटे यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर बोट ठेवले.यावेळी दालनात सीमंतिनी कोकाटे यांच्यासोबत बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ, योगेश घोटेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी लता गवळी, पर्यवेक्षक अनुराधा राऊत, एफ. के. बढे, एस.बी. शिंदे, वैद्यकीय अधिकारी सौ. गाढे आदी उपस्थित होते.