नाशिक - पंचवटी सीतागुंफा रोडवरील शिवाजीचौक परिसरात रस्त्यावर उभ्या केलेल्या 4 चारचाकी वाहनांच्या शुक्रवारी (29 जून) पहाटेच्या सुमाराला अज्ञात टवाळखोरांनी काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. वाहनांच्या काचा फोडल्यानंतर संशयितांनी परिसरातील काही नागरिकांच्या घरावरही दगडफेक केल्याचे परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले आहे. परिसरात घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांत काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले होते.
याबाबत माहिती समजतात पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह गुन्हेशोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. शिवाजीचौक परिसरातील रस्त्यालगत काही नागरिकांनी नेहमीप्रमाणे आपल्या चारचाकी शुक्रवारी रात्रीच्या सुमाराला उभ्या केल्या होत्या पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास काही अज्ञात टवाळखोरांनी रस्त्यालगत उभ्या केलेल्या 4 चारचाकी वाहनांच्या काचा कशानेतरी फोडल्या त्यानंतर संशयितांनी परिसरात राहणाऱ्या मुठाळ नामक व्यक्तीच्या घरावरही दगडफेक केल्याचे समजते.
परिसरात मध्यरात्रीच्या सुमाराला काही मद्यपी तसेच टवाळखोरांचा वावर असून शिवाजी चौकात दहशत माजविण्याचा उद्देशानेच टवाळखोरांनी उद्या वाहनांच्या काचा फोडून दगडफेक केली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे शुक्रवारी सकाळी चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या चे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केलेली होती संशयितांनी रस्त्यालगत उभ्या असलेल्या मारुती 800 (एम एच 15 ए एस 1930, मारुती ओमनी कार क्रमांक (एम एच 15 ए एस 6338), मारुती अल्टो कार (एम एच 15 डी एम 7454) व अन्य एक अशा चार वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले आहे. या घटनेनंतर वाहनांच्या मालकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. संशयितांवर कारवाई करणारसीतागुंफा रोडवरील शिवाजी चौकात शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला अज्ञात टवाळखोरांनी उभ्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात तत्काळ भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली आहे. वाहनांच्या वाचा फोडणाऱ्या संशयितांवर कारवाई केली जाणार असून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य म्हणून तपासकामी संशयितांची नावे समजल्यास तत्काळ माहिती द्यावी. - मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी.