पेठ : मिशन आॅलिम्पिक तयारीसाठी बालेवाडी (पुणे) येथे गॅस अथॉरिटी आॅफ इंडिया (गेल) व नॅशनल युवा को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि. यांच्यातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेत धावपटूंची निवड चाचणी घेण्यात आली. राज्यस्तरीय स्पर्धेत नाचलोंढी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी वर्षा चौधरी हिने तेज गेल रफ्तार चाचणी स्पर्धेत ४०० मीटरमध्ये प्रथम क्र मांक मिळविला व स्पर्धेत बेस्ट टाइमिंग दिल्यामुळे तिची निवड दिल्ली येथील राष्ट्रीय पातळीवरील पात्रता चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली असून, वर्षाला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पेठसारख्या अतिदुर्गम तालुक्यातील नाचलोंढी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्राथमिक शिक्षक भगवान हिरकूड यांच्या मार्गदर्शनाखाली ताई बामणे नंतर वर्षा चौधरीला आॅलिम्पिकचे वेध लागले असून, २०२० मध्ये टोकियो येथे होणाºया स्पर्धांसाठी तयारी करून घेण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसताना पेठच्या दºयाखोºयात अनवाणी धावण्याचा सराव करत वर्षाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली असून, तिच्यासाठी आॅलिम्पिकमध्ये सहभाग हे मोठे लक्ष्य असणार आहे. चिपळूण (रत्नागिरी) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यावर महाराष्ट्राचे लक्ष वर्षाने वेधून घेतले. प्रशिक्षक विजेंद्र सिंग, धावपटू कविता राऊत यांनी वर्षाची भेट घेऊन तिला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मिशन आॅलिम्पिक : वर्षा चौधरी करणार राज्याचे प्रतिनिधित्व पात्रता चाचणीत महाराष्ट्रात नाचलोंढीची धावपटू अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:20 AM
पेठ : मिशन आॅलिम्पिक तयारीसाठी बालेवाडी (पुणे) येथे गॅस अथॉरिटी आॅफ इंडिया (गेल) व नॅशनल युवा को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि. यांच्यातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेत धावपटूंची निवड चाचणी घेण्यात आली.
ठळक मुद्दे पात्रता चाचणी स्पर्धेसाठी निवडटोकियो येथे होणाºया स्पर्धांसाठी तयारी