संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्रातील प्रतिनिधींची रविवारी नाशिक येथे बैठक झाली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेस राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर, संयुक्त किसान मोर्चाचे संदीप आबा गिड्डे-पाटील, राष्ट्रीय किसान महासंघाचे संयोजक श्रीकांत तराळ, लातूर येथील शेतकरी नेते लक्ष्मण वंगे, नाशिकचे संघर्ष शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, जळगाव येथील किसान क्रांतीचे एस. बी. नाना पाटील, अहमदनगर येथील राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे अरुण कान्होरे, नाशिकचे किसान क्रांतीचे योगेश रायते, अमोल गोरडे, पद्माकर मोराडे आदी प्रतिनिधी उपस्थित होते
केंद्र सरकारने केलेल्या ३ कायद्यांमध्ये ३९ त्रुटी असून, केंद्र सरकारने त्या मान्य केल्या आहेत. तरीही या कायद्याचे समर्थन केले जात असेल, तर ही शेतकरी चळवळीसाठी दुर्दैवी बाब आहे, असे मत शंकर दरेकर यांनी यावेळी बोलताना मांडले. संयुक्त किसान मोर्चाची राष्ट्रीय कोअर कमिटी लवकरच मुंबई येथे येणार असून, महाराष्ट्रातील आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.