नाशिक : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नाकारताना मनमानी दिलेले निकाल आणि विद्यार्थ्यांची अडवणूक केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने समिती निलंबित केली असून, उपाध्यक्षपदाचा पदभार प्रकल्प अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सोपविला असल्याचे वृत्त आहे. समितीमधील ज्या तीन सदस्यांवर न्यायालयाने आक्षेप घेतला आहे त्या तीनही सदस्यांमध्ये गुरुवारी पदभार सुपूर्द करण्याची धावाधाव सुरू होती. सायंकाळपर्यंत मित्तल यांनी या तिघांकडूनही सर्व दफ्तर ताब्यात घेतले.अनुसूचित जमातीसाठी येथील विभागीय जात पडताळणी समितीने अनेक चुकीचे निकाल दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे तसेच न्यायालयाने आदेश देऊनही आदेशाकडे दुर्लक्ष करीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र नाकारण्यात आल्याची अनेक प्रकरणे न्यायालयासमोर आली आहेत. न्यायालयासमोर मांडण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे आणि कोर्टातील कबुलीत समोर आलेल्या प्रकरणामुळे न्यायालाने समितीचे उपाध्यक्ष डी. के. पानमंद, सदस्य सचिव जागृती कुमरे व श्रीमती अहिरराव यांच्या मनमानी कारभारावर तीव्र ताशेरे ओढत समितीच बरखास्त करीत या तिघांचीही खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले. जात वैधता देताना राखून ठेवण्यात आलेले निकाल, त्रुटी यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला तर समिती सदस्यांमध्ये यासंदर्भात एकमत होत नसल्यामुळे जात पडताळणीतील गोंधळ समोर आला होता. त्या आधारे न्यायालयाने कठोर शब्दात समिती सदस्यांना सुनावलेच शिवाय दंडात्मकदेखील कारवाई केली आहे. नूतन समिती सदस्य नियुक्तदरम्यान, नाशिकचे प्रकल्प अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे समितीच्या उपाध्यक्ष पदाचा पदभार देण्यात आल्यानंतर नूतन समिती सदस्यांची देखील नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजते. यामध्ये अपर आदिवासी कार्यालयातील प्रदीप पोळ, जात पडताळणीतील वरिष्ठ संशोधन अधिकारी उन्हाळे, गव्हाणे यांची नियुक्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.
मित्तल यांच्याकडे उपाध्यक्षाचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:51 AM
नाशिक : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नाकारताना मनमानी दिलेले निकाल आणि विद्यार्थ्यांची अडवणूक केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने समिती निलंबित केली असून, उपाध्यक्षपदाचा पदभार प्रकल्प अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सोपविला असल्याचे वृत्त आहे. समितीमधील ज्या तीन सदस्यांवर न्यायालयाने आक्षेप घेतला आहे त्या तीनही सदस्यांमध्ये गुरुवारी पदभार सुपूर्द करण्याची धावाधाव सुरू होती. सायंकाळपर्यंत मित्तल यांनी या तिघांकडूनही सर्व दफ्तर ताब्यात घेतले.
ठळक मुद्देजातपडताळणी समिती; सदस्यांची धावाधाव