नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत जनता कर्फ्यूचा सर्वपक्षीय व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले होते. यात भाजीपाला, किराणा या अत्यावश्यक सेवा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातच कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने प्रशासकीय यंत्रणेने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा, भाजीबाजारात खरेदीसाठी शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती. यात सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून येत्या दोन दिवसात बडी रात असल्याने जनता कर्फ्यूबाबत मुस्लिम समाजात नाराजी पसरली आहे.
इन्फो
बाजार समितीही बंद
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीनेही जनता कर्फ्यूदरम्यान कांदा, भाजीपाला व भुसार मालाचा लिलाव बंद ठेवल्याने शेतकरीवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. नियमबाह्यपणे सलग तीन दिवस बाजार समिती बंद ठेवता येत नसल्याबाबत प्रहार शेतकरी संघटनेचे हरीभाऊ महाजन यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे.
कोट....
मुळात शासन निर्बंध आणि केला जात असलेला जनता कर्फ्यू चुकीचा आहे. शासनाने कुठलाही बंद न ठेवता २४ तास दुकाने सुरू ठेवावी. त्यामुळे एकाच वेळी गर्दी होणार नाही. सध्या विशिष्ट वेळेत दुकाने सुरू राहत असल्याने मोठी गर्दी होऊन कोरोना वाढत आहे. जनता कर्फ्यूमुळे काही साध्य होणार नाही. उलट व्यापारी, जनता व शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होणार आहे.
- अॅड. माणिकराव शिंदे, ज्येष्ठ नेते, येवला