घोटी : भारत बंदला इगतपुरी तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. इगतपुरीत दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला, तर घोटी बाजारपेठ सुरुळीत सुरू असली तरी शेतकरी बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेऊन आपले व्यवहार ठप्प ठेवले.घोटी कृषी उत्पन्न बाजारपेठेतही भारत बंदचा परिणाम दिसून आला. शेतकऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले, तर शेतकरी बांधवांनी भातविक्रीच्या प्रक्रियेकडेही पाठ फिरवली. इगतपुरी शहरातही दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना समर्थन दिले.इगतपुरी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध करत तहसीलदार यांना निवेदन दिले. महाविकास आघाडीचे पदाधिकारी माजी आमदार पांडुरंग गांगड, बाजार समिती उपसभापती गोरख बोडके, जिल्हा बँक संचालक संदीप गुळवे, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, जनार्धन माळी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, बाळासाहेब वालझाडे, अनिता घारे आदींचा सहभाग होता.
भारत बंदला इगतपुरी तालुक्यात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 11:15 PM
घोटी : भारत बंदला इगतपुरी तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. इगतपुरीत दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला, तर घोटी बाजारपेठ सुरुळीत सुरू असली तरी शेतकरी बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेऊन आपले व्यवहार ठप्प ठेवले.
ठळक मुद्दे शेतकऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले