सिन्नर : लग्नात बडेजाव मिरविण्यासाठी हजारोंची गर्दी आणि पैशांची उधळपट्टी करणाऱ्यांची कमी नाही. कोरोनाच्या काळात विवाह सोहळ्यांवर शासनाने कितीही कडक निर्बंध लावले तरी लपूनछपून शेकडोंच्या उपस्थितीत लग्न लावून अनेकांचे जीव धोक्यात आणणारेही आपण पाहिले आहेत. मात्र या सर्व गोष्टींना सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे अपवाद ठरले आहे. संपूर्ण सिन्नर मतदारसंघच आपले कुटुंब असल्याने त्यातून टॉप ५० जणांना विवाह सोहळ्याचे आमंत्रण द्यायला आपल्याला या आयुष्यात तरी जमणार नाही, असे म्हणत आमदार मणिकराव कोकाटे यांनी त्यांची एकुलती एक कन्या सीमंतिनी हिचा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा समाजाभिमुख निर्णय जाहीर केला आहे.
आजपर्यंतच्या राजकीय, सामाजिक व खासगी जीवनात जेव्हा जेव्हा महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा समाजहिताचे लोकाभिमुख निर्णय घेण्याचा कोकाटे यांचा हातखंडा आहे. कोकाटे यांनी ''त्या'' काळात केलेले स्वतःचे छोटेखानी लग्न, एका मुलीवर थांबण्याचा निर्णय हे त्यापैकीच एक आहेत. आतादेखील गुरुवारी (दि. १) कोकाटे यांची कन्या, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी हिचा विवाह साध्या नोंदणी पद्धतीने करावयाचे ठरविले आहे. याबाबत कोकाटे यांनी सांगितले की, माझ्या परिवारातील आजपर्यंत साध्या पध्दतीच्या विवाहाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आहे. ‘सीमंतिनी' ही विवाहबंधनात अडकत असताना माझे मन मात्र जनतेच्या प्रेमात अडकले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार केवळ पन्नास लोकांमध्ये हा विवाह सोहळा करणे माझ्यासाठी तरी शक्य नाही. संपूर्ण मतदारसंघ माझे कुटुंब आहे, त्यातून पन्नास लोक निवडणे माझ्यासाठी या जन्मी तरी अशक्य आहे. मतदार संघातील १५१ मुलींचे लग्न मला माझ्या मुलीच्या लग्नात लावून सामुदायिक विवाह किंवा त्याऐवजी साध्या नोंदणी पद्धतीनेच विवाह करण्याची आपली इच्छा होती. पण कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होऊ नये याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
फोटो-२७कोकाटे
===Photopath===
270621\27nsk_43_27062021_13.jpg
===Caption===
फोटो-२७कोकाटे