नांदगाव विधानसभा मतदारसंघातल्या १७८ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० लीटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ५५० आशा सेविकांना, पीपीई किट, साडी, मास्क, हँडग्लोव्हज आमदार कांदे यांच्या स्वखर्चाने देण्यात आले आहेत. विजेचा शॉक लागून मृत्यू झालेले ढेकू, ता. नांदगाव येथील ग्रामपंचायत कर्मचारी सोपान चव्हाण यांच्या पत्नी रेखा सोपान चव्हाण व कुटुंबीयांना कांदे यांच्या माध्यमातून ९ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली असून, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गतदेखील मदत मिळवून देण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले. वऱ्हाणे ता. मालेगाव येथील शालेय विद्यार्थिनी सोनाली सुभाष गांगुर्डे व शुभांगी हनुमान पवार यांचा गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनादेखील राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह योजनेतून प्रत्येकी ७५ हजार रुपये आर्थिक मदत मिळवून देण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नांदगाव नगराध्यक्ष राजेश कवडे, विष्णू निकम, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, पंचायत समिती सभापती सुभाष कुटे, माजी सभापती विलास आहेर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तेज कवडे, उपसभापती राजेंद्र देखमुख, येसगावचे सरपंच सुरेश शेलार, मालेगाव शिवसेना तालुका प्रमुख पंकज निकम, काँग्रेस तालुका अध्यक्ष समाधान पाटील, शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. रोहन बोरसे, उपजिल्हा रुग्णालय मनमाड वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोविंद नरवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ससाणे आदी उपस्थित होते.
कोट....
जीवाची पर्वा न करता गेले दीड वर्ष आम्ही काम करत आहोत. आज आम्हाला मिळालेली साडी ही जणू ‘माहेरची साडी’ आहे. कोणीतरी आमच्या पाठीशी आहे. ही भावना प्रेरणा देणारी आहे.
- दीपाली कद, आशा वर्कर
फोटो- २२ कांदे नांदगाव
व्हेंटिलेटरचे लोकार्पण करताना आमदार सुहास कांदे. समवेत नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रोहन बोरसे, मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. गोविंद नरवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे.
===Photopath===
220521\22nsk_12_22052021_13.jpg
===Caption===
फोटो- २२ कांदे नांदगाव व्हेंटीलेटरचे लोकार्पण करतांना आमदार सुहास कांदे. समवेत नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रोहन बोरसे, मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. गोविंद नरवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे.