लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहिराती व फलक त्वरित काढण्याची मागणी मनसेच्या प्रतिनिधी मंडळाने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला केल्याने या हल्ल्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. चीनच्या या आगळीकीने देश व राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड रोषाची भावना व्यक्त होत असून, याच पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त गमे यांची भेट घेऊन नाशिक शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहिराती व फलक त्वरित काढण्यात याव्यात यासाठी निवेदने सादर केले. यावेळी मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, जिल्हा सरचिटणीस अक्षय कोंबडे, जिल्हा सचिव संदेश जगताप उपस्थित होते.
चिनी उत्पादनांच्या जाहिरांतींविरोधात मनसे आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:15 PM
नाशिक : भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहिराती व फलक त्वरित काढण्याची मागणी मनसेच्या प्रतिनिधी मंडळाने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.
ठळक मुद्देसर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड रोषाची भावना