नाशिक : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी १ रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजा सुरू करावी, सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत सातबारा कोरा करावा व मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मनसेच्यावतीने सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि.४) लाक्षणिक आंदालन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख,प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतन कुमार इचम , जिल्हाध्यक्ष अंकुश पवार,शहराध्यक्ष सुदाम कोंबडेयांच्या उपस्थितीतीत प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय तसेच नाशिक शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. शासनाने २० मार्च २०२५ रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार शेतकऱ्यांचा एक रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याच प्रकारे ऐनवेळी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास नकार दिला. यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाल्याने सदर गोष्टीवर शासनाने प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून एक रुपया प्रधानमंत्री पिक विमा योजना त्वरित चालू करावी. राज्यातील सुरक्षा सुव्यवस्था बाबत जनसामान्यांमध्ये आता प्रश्न उभे राहू लागलेले आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे.
निष्पाप कार्यकर्त्यांचा जनसामान्यांचा बळी जात आहे राज्य सरकार झोपले आहे की काय असा प्रश्न येथे उपस्थित करण्यात आले. यावेळी महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे,जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील ,मनोज घोडके, खंडेराव मेढे नितीन काळे, सचिन सिन्हा, सत्यम खंडाळे, नितीन माळी, धीरज भोसले ,योगेश दाभाडे, बंटी कोरडे, ज्ञानेश्वर बगडे, विजय अहिरे, विशाल भावले,मिलिंद कांबळे, अर्जुन वेताळ, गोकुळ नागरे, विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, संदीप दोंदे, अतुल पाटील, विश्वास तांबे, किरण सिरसागर ,राकेश परदेशी, नितीन दानापुणे, महिला सेना शहराध्यक्ष आरती खिराडकर,अक्षरा घोडके,अरुणा पाटील,शैला शिरसाट, अश्विनी बैरागी, एकता सोनार, राजू परदेशी, नितीन अहिरराव ,विश्वास रुपवते, अविनाश अंबपुरे, नवनाथ जाधव, रोहित उगावकर, बबलु ठाकुर,अमोल गोजरे, राहुल पाटील उपस्थित होते.