सिडको : सध्या सर्वत्र मंदीची लाट चालू असतानाही शासनाने गॅस दरवाढ केल्याने सामान्य जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी आज सिडको भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने केली.सिडको हॉस्पिटलसमोर मनसेच्या विद्यार्थीसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश मोरे व मनसे रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष सागर कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढीविरोधात निदर्शने करण्यात आली. शासनाने केलेली गॅस दरवाढ अन्यायकारक असल्याने सामान्य जनता त्यात होरपळली जात आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहचवून गॅस दरवाढ कमी करण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या सर्वत्र आर्थिक मंदीची लाट असतानाही शासनाने गॅस दरवाढ केली असून, ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी यासाठी शुक्रवारी मनसेने पुढाकार घेतलेला आहे. यावेळी अॅड. महेंद्र डहाळे, महिला आघाडी शहराध्यक्ष रिना सोनार, अरुणा पाटील, भालचंद्र देसले, संदेश जगताप, अमोल मोरे, गुंजन पाटील, प्रणव मानकर, सागर दंडगव्हाळ, समाधान अहेर, नामदेव अहेर, रोहण जगताप, संदीप अहेर, सुनील दातीर, विकी जाधव, प्रवीण नागरे आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)
गॅस दरवाढीविरोधात मनसे आक्रमक
By admin | Published: March 04, 2017 1:32 AM