शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मनसेच्या पहिल्या यादीत ५४ उमेदवारांची घोषणा

By admin | Published: February 03, 2017 1:10 AM

नऊ नगरसेवकांना उमेदवारी : तीन माजी नगरसेवकांचाही समावेश

 नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्यांबाबत घोळ सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ५४ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (दि.२) सायंकाळी घोषित करत आघाडी घेतली. मनसेने भाजपा नगरसेविकेबरोबरच पक्षाच्या आठ नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. पहिल्या यादीत महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह शहराध्यक्ष राहुल ढिकले, नगरसेवक यशवंत निकुळे, सुजाता डेरे व रेखा बेंडकोळी यांची नावे नाहीत. महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शुक्रवारी (दि.३) अखेरचा दिवस आहे. गुरुवारी दिवसभर राजकीय पक्षांकडून घोषित होणाऱ्या उमेदवारांच्या यादीची प्रतीक्षा होती. त्यात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मनसेने सर्वांत प्रथम आघाडी घेत आपल्या ५४ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली. पहिल्या यादीत प्रामुख्याने, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, सभागृहनेत्या सुरेखा भोसले, मेघा साळवे, सविता काळे, कांचन पाटील, गटनेता अनिल मटाले आणि अर्चना जाधव तसेच स्वीकृत नगरसेवक संदीप लेनकर यांचा समावेश आहे. याशिवाय, चार-पाच दिवसांपूर्वीच भाजपातून मनसेत दाखल झालेल्या विद्यमान नगरसेवक ज्योती अर्जुन गांगुर्डे यांना प्रभाग ३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माजी नगरसेवक अनंत सूर्यवंशी, सेनेचे माजी नगरसेवक अस्लम मणियार, सेनेचेच माजी नगरसेवक बाळासाहेब मटाले यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांच्या पत्नी शेख फरिदा यांना प्रभाग १० मधून उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पहिल्या यादीत महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष राहुल ढिकले यांची नावे नाहीत परंतु, कुंपणावर असलेल्या यशवंत निकुळे, रेखा बेंडकुळी यांचाही समावेश नसल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. (प्रतिनिधी)