नाशिक - येथील मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने गुटखा आणि ऑनलाईन जुगारच्या जाहिराती करणाऱ्या सिने कलावंतांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला.सोशल मीडियाच्या जमान्यात सिने कलावंत तरुण पिढीला जुगारीच्या, गुटख्याच्या जाहिराती करून वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांच्या नादी लावत आहे. त्यामुळे अनेक तरुण कर्जबाजारी आणि व्यस्त झाले आहेत.
तरुणांना झटपट श्रीमंत होण्यासाठी या जुगारीच्या जाहिराती प्रत्येक ॲपमध्ये दिसतात. त्यामुळे सामान्य तरुण यांना आकर्षित होऊन त्यामध्ये पैसे लावतात. परंतु हे खेळत असताना त्याला कोणताही आर्थिक फायदा होत नसून त्याचे पैसे नेहमीच जातात. त्यामुळे तो आर्थिक गरजेच सापडत जातो आणि आपल्या जवळचे किंवा आपल्या घरच्यांचे सर्व पैसे गमावून बसतो अशावेळी तो मानसिक त्रासाला सामोरे जातो. यामुळे अनेक जणांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असून ह्या सरकारने ॲपवर बंदी घालावी आणि या जाहिरातींवरही बंदी घालावी अशी मागणी विद्यार्थी सेनेने केली आहे.
यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत चौधरी, उमेश भोई, बाजीराव मते,जिल्हाध्यक्ष मनोज गोवर्धने,उपजिल्हाध्यक्ष नितीन धानापुणे,शहराध्यक्ष ललित वाघ, शहर संघटक अक्षय कोंबडे,सिडको विभाग अध्यक्ष मेघराज नवले,दीपक बोराडे, शिवम आढाव,अजिंक्य देवरे, शहर संघटक नितीन पंडित, अक्षय खांडरे, धरम गोविंद,मोनिष पारेख, मयूर जैन,मनोज सावंत,दर्शन बोरसे, ऋषी कांबळे, सुयश मंत्री,मोहित पाटील,गणेश शेजुळ,गोवर्धन आव्हाड आदी उपस्थित होते.