गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच शुक्रवारी (दि.५)प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. एका विवाह सोहळ्यासाठी ते नाशिकमध्ये आले असले तरी अनेक महिन्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी गर्दी झाली होती. निवडक पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी चर्चा करतानाच त्यांनी मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येदेखील शाखा अध्यक्षांप्रमाणेच गट अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांचा दर्जा उन्नत करण्यासाठी आता लक्ष घालण्यात आहे. गट अध्यक्ष हे तळागाळातील कार्यकर्ते आणि नागरीकांपर्यंत संबंधित असतात. त्यांना कार्यप्रवण करणे आवश्यक आहे. त्यामुळे वेगळ्याप्रकारे त्यांना मेाठे करण्याचे काम करण्यात येणार आहे. नाशिक शहरात अशा प्रकारे गट अध्यक्षांना महत्व देण्यात येणार असून त्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या संकल्पनेचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिली.
नाशिक शहरात ही संकल्पना राबविण्यासाठी दोन आठवड्यात सर्व शाखा अध्यक्ष व गट अध्यक्षांची यादी मुंबईत पाठवण्यास सांगण्यात आले आहेत. त्यानंतर मुंबईहून देान पदाधिकारी नाशिकमध्ये येतील आणि ते पुढील रचना करणार आहेत.
इन्फो...
संघटनात्मक बांधणीवर भर
मनसेकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिले जाण्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत. नाशिकमध्ये मनसेचा प्रभाव होता. संघटन हा त्याचा मूळ धागा होता. त्यामुळे संघटनावर भर देण्यात येणार असल्याचे समजते.