सिन्नर : सिन्नर - नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असतानाही शिंदे येथील टोल नाका सुरू करण्यात आल्याचा आरोप करीत सिन्नर तालुका महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने टोलवसुलीविरोधात आंदोलन केले. नाक्याच्या परिघातील २० किलोमीटर अंतराच्या आतील असलेल्या सिन्नर तालुक्यातील वाहनधारकांकडून टोलवसुली करण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी शिंदे येथील टोल नाक्यावर रास्ता रोको करीत आपला संताप व्यक्त केला. तालुक्यातील व्यावसायिक, नागरिक, कामगार व चाकरमाने यांना दररोज नाशिकला ये-जा करावी लागते. त्याचबरोबर शेतकºयांना शेतमाल विक्रीसाठी नाशिकला जावे लागते. तसेच नोकरीसाठी नियमितपणे नाशिकला ये-जा करणाºयांचे प्रमाण मोठे आहे. त्यासाठी त्यांना नाशिक -पुणे महामार्गाचा अवलंब करावा लागतो. शिंदे येथील टोल नाक्यावरून या सर्व घटकांचे ये-जा करणे क्रमप्राप्त आहे. त्यांना प्रत्येकवेळी टोल भरावा लागणार असून, त्यासाठीचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. टोल नाक्याच्या परिघातील २० किमी अंतराच्या आत वास्तव्य करणाºया वाहनाना पथकारातून सवलत दिली जात असली तरी सिन्नर तालुक्यातील नियमित ये-जा करणाºया वाहनधारकांवर मासिक पासच्या नावाखाली अन्याय होत असल्याचा आरोप मनसेने केला. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सुमारे अर्धातास आंदोलन केल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक ढोकणे, पोलीस निरीक्षक भुजबळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रहिवाशांंचा तीव्र विरोधटोलवसुलीला तालुक्यातील रहिवाशांंचा तीव्र विरोध होत असून, संपूर्ण तालुक्याला टोलमधून वगळण्याची आग्रही मागणी होत आहे. जनभावना लक्षात घेऊन सिन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, रहिवाशी व नोकरदार वर्ग यांना शिंदे येथील नाक्यावर कर आकारणीतून वगळण्यात यावे यासाठी मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनसैनिकांसह परिसरातील रहिवाशी, शेतकरी, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिकांनी शिंदे टोल नाक्यावर धडक देऊन रास्ता रोको आंदोलन केले.
शिंदे टोलनाक्यावर मनसेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:16 AM
सिन्नर : सिन्नर - नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असतानाही शिंदे येथील टोल नाका सुरू करण्यात आल्याचा आरोप करीत सिन्नर तालुका महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने टोलवसुलीविरोधात आंदोलन केले. नाक्याच्या परिघातील २० किलोमीटर अंतराच्या आतील असलेल्या सिन्नर तालुक्यातील वाहनधारकांकडून टोलवसुली करण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ठळक मुद्देघोषणाबाजी : सिन्नर तालुक्यातील वाहने पथकरातून वगळण्याची मागणीसिन्नर तालुक्यातील वाहनधारकांकडून टोलवसुली करण्यात येऊ नये, अशी मागणीरहिवाशांंचा तीव्र विरोध