दिंडोरी : मनसेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच तालुक्यातील मनसेच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाध्यक्षांकडे राजीनामे सोपविल्याने तालुक्यात पुन्हा एकदा पक्षाला धक्का बसला आहे. या राजीनामा सत्रामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिलेल्यांमध्ये मनसेचे उपतालुकाध्यक्ष जीवन मोरे व सुनील शिंदे, माणिकराव गणोरे, सरचिटणीस गोरख झोटिंग, दीपक पोटिंदे, दिंडोरी शहराध्यक्ष रावसाहेब बोरस्ते, शहर उपाध्यक्ष दीपक जाधव, शहर संघटक गोविंद देशमुख, तालुका चिटणीस राजेंद्र पेलमहाले, उपविभागाध्यक्ष सुनील वडजे, बंडू देशमुख, प्रकाश मोगल, वणी शहर संघटक जुबेर शेख, धरम पवार, शारीरिक प्रशिक्षण सेनेचे तालुकाध्यक्ष गोविंद मालसाणे, शहराध्यक्ष लखन पिंगळ, सचिन जाधव व तालुक्यातील शाखाप्रमुख, असंख्य कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. राजीनामे देणाऱ्यांत विलास वडजे, रवि जाधव, संदीप जाधव, शिवाजी पिंगळे, प्रकाश अहेर, विनायक शिंदे, सुदाम शिंदे, कृष्णा राऊत, चिंतामण कराटे, नितीन शार्दुल, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन गायकवाड, गणेश धुमणे, संतोष पाटील, मंगेश जाधव, भूषण मोरे, नंदू पिंगळ, राकेश पिंगळ, रमेश दिघे, प्रकाश दिघे, अनिल दिघे, सुनील तिडके, सागर जाधव, प्रवीण जाधव, विजू जाधव, शिरीष बोरस्ते, बबन गांगोडे, अजय आपसुंदे, किरण आपसुंदे, राहुल शिंदे, अतुल बुनगे, शरद बुनगे, रोशन दिवटे, राहुल दिवटे, निशांत लोखंडे, चेतन लोखंडे आदिंचाही समावेश आहे. (वार्ताहर)
मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
By admin | Published: February 05, 2017 11:35 PM