नाशिक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेतृत्व करावे, असे म्हटले होते. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी सदिच्छा व्यक्त केली होती. यावरून आता मनसेकडून खिल्ली उडवण्यात आली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनाकडे लवकर जात नाही ते देशात फिरून नेतृत्व काय करतील, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे. (mns sandeep deshpande react about uddhav thackeray to become prime minister)
“तुम्ही पर्यावरणमंत्री असून काय केलं?” संतप्त चिपळूणकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल
दक्षिण आणि उत्तरेतील राज्यांतील जनतेला आपलेसे वाटू शकेल असे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांचे असल्याने, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचे स्वप्न साकार करावे. त्यांनी भविष्यात पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी सदिच्छा राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली होती. तसेच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावे, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या होत्या. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक टीका केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात नाशिक महापालिका निवडणूक लढणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
“उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सुसंस्कृत-संयमी; पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यास आनंदच होईल, पण...”
ते देशात फिरून नेतृत्व काय करतील?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनाकडे लवकर जात नाही ते देशात फिरून नेतृत्व काय करतील? शिवसेना नेते खासदार संजय राऊत कधी डॉक्टर बनतात कधी कंपाउंडर, ते काहीही बोलतात, या शब्दांत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी जात होते. त्यावेळी खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरात लँड होऊ शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माघारी फिरावे लागले होते. त्यावरुनही संदीप देशपांडेंनी निशाणा साधला.
मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम
राजकारण बाजूला ठेऊन प्रकल्पांची सुधारणा करावी
राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून, नाशकात तयार झालेल्या प्रकल्पांची अमित ठाकरे यांनी पाहणी केली. काही ठिकाणी अत्यंत दुरावस्था आहे. मनसे काळातील प्रकल्पांची राजकारण बाजूला ठेऊन सुधारणा करावी. तशी मागणी नाशिक महापालिका आयुक्तांना केली आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. संदीप देशपांडे हे अमित ठाकरे यांच्यासह नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित ठाकरे, संदीप देशपांडेंनी नाशिकमध्ये मनसेने उभारलेल्या बोटॅनिकल गार्डनला भेट दिली.