शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

मोबाइल आयएमईआय बदलणारी टोळी गजाआड

By admin | Published: July 10, 2017 12:19 AM

आझादनगर :मोबाइल दुरुस्ती करणाऱ्या सहा मोबाइल दुकानांवर पोलिसांनी एकाचवेळी छापा टाकला.

लोकमत न्यूज नेटवर्कआझादनगर : शहरातील मोबाइल दुरुस्ती करणाऱ्या दुकानदारांकडून चोरीच्या मोबाइलचे आयएमईआय नंबर बदलून देण्यात येत असल्याच्या संशयावरून शहरातील विविध भागातील सहा मोबाइल दुकानांवर पोलिसांनी काल रात्री आठ वाजता एकाचवेळी छापा टाकला. यात सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आयएमईआय क्रमांक बदली करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह एकूण ५९८ मोबाइल, लॅपटॉप असा १४ लाख ५६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहापैकी तीन आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना बुधवारपर्यंत (दि. १२) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. मालेगाव शहर व परिसरातील मोबाइल चोरीच्या घटनेत वाढ होऊन नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांनी याची गंभीर दखल घेत शहरातील काही दुकानदारांकडून मोबाइलचे एमआयईएम नंबर बदलून दिले जात असल्याची माहिती काढून शनिवारी रात्री आठ वाजता शहरातील सहा मोबाइल दुकानांवर छापा मारला. विशेष म्हणजे, राजमाने यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचना देत सहाही ठिकाणी एकाचवेळी छापा मारला. यावेळी आझादनगर पोलीस ठाण्याअंतर्गत गांधी चौक येथील देशमुख मोबाइल शॉपीचा मालक सुफीयान देशमुख, चंदनपुरीगेट येथील मोहंमद मोबाइल शॉपीचे एजाज अहमद, नयापुरा येथील हिंदुस्तान मोबाइलचे मालक सोहेल अहमद निसार अहमद, छावणी पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर येथील राजू मोबाइल शॉपीचे तमसील बशर एकबाल अहमद, शहर पोलीस ठाणे अंतर्गत किदवाई रोडवरील फाइन टच मोबाइल शॉपीचे लईक अहमद मोहंमद मुर्तुजा व आयेशानगर पोलीस ठाणे हद्दीतील सुपर मार्केट येथील सेल-झोनचा मालक अबुलऐस एकबाल अहमद यांना ताब्यात घेण्यात आले.वरील सर्व संशयितांकडून पाच सीपीओ, दोन लॅपटॉप, दोन हार्डडिक्स, २० डोंगल व मोबाइलचे मूळ क्रमांक बदलण्यासाठी वापरण्यात येणारे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाइल सॉफ्टवेअर मारण्याकामी वापरले जाणारे साहित्य तसेच आयएमईएम क्रमांक बदललेले मोबाईल व एकूण ५९८ मोबाइल असा १४ लाख ५६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील सर्व आरोपींना रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आणून राजमाने यांनी विश्वासात घेतले असता त्यांनी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.रात्री उशिरा सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना न्यायालयात उभे केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.आझादनगर पोलीस ठाणे अंतर्गत तीन मोबाइल दुकानांवर कारवाई करण्यात आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याकामी उशीर झाल्याने या तीन संशयितांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती राजमाने यांनी दिली. नागरिकांनी चोरीचे मोबाइल घेऊ नये. तसे कृत्य करताना कुणी आढळल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन पोद्दार यांनी केले.