ठेंगोडा : परिसरातील खासगी मोबाइल कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये एक महिन्यापासून अचानक बिघाड झाल्याने फोन लावल्यानंतर पलीकडील आवाज न येणे, नेटवर्क कमी असल्याने फोन कट होणे अशा समस्या निर्माण होऊ लागल्या असून, मोबाइलधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.नेटवर्क कमी असल्याचा फटका इंटरनेटच्या सेवेवरही झाला असून, इंटरनेट सेवाही मोठ्या प्रमाणात कोलमडली आहे.नेटवर्कच्या या तांत्रिक बिघाडाबाबत मोबाइलधारकांनी ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे तक्र ार केली असता थोड्याच दिवसात नेटवर्कची समस्या सोडविली जाईल असे आश्वासन ग्राहक सेवा प्रतिनिधींकडून देण्यात येते मात्र प्रत्यक्षात महिना उलटून गेल्यावरही तांत्रिक बिघाडात कोणतीही सुधारणा होत नसल्याने खासगी कंपनीच्या मोबाइलधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, याबाबत ग्राहकसेवा प्रतिनिधीशी संपर्क साधला असता परिसरातील मोबाइल ग्राहकांना ताहाराबाद व परिसरातील मोबाइल मनोऱ्यावरून नेटवर्क मिळत असून, नवीन मनोरा उभारणीचे काम सध्या सुरू आहे. ते कार्यन्वित होण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागणार असल्याने त्यानंतर सेवा सुरळीत होणार असल्याचे सागंण्यात आले. (वार्ताहर)
ठेंगोडा परिसरात भ्रमणध्वनी सेवा कोलमडली
By admin | Published: January 16, 2016 10:17 PM