नाशिक : हिरावाडीतील कमलनगर परिसरात असलेल्या कृष्णा कॉम्प्लेक्स इमारतीसमोरच्या बाजूचे मोबाईल विक्री व दुरुस्ती दुकानाचे पत्रे उचलून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील रोकड तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल चोरी करून नेल्याची घटना गुरुवारी (दि.४) सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हिरावाडीतील या चोरीप्रकरणी प्रितेश ईश्वर पटेल त्यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पटेल यांचे हिरावाडीतील कमलनगर परिसरात दुकाने असून बुधवार व गुरुवारच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल दुकानाचे पत्र उखडवून दुकानात ठेवलेले विविध कंपन्यांचे ७५ हजार रुपये किमतीचे १५ मोबाईल फोन तसेच दोन हजार रुपयांची रोकड असा एकूण ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिरावाडीतील नागरी वसाहतीत घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्या संशयितांनी मोबाईल दुकान फोडून चोरी केली ते चोरटे हिरावाडी परिसरातील असल्याची शक्यता पोलींसा सूत्रांनी वर्तविली आहे.
नाशकात मोबाईलचे दुकान फोडून 77 हजारांचा ऎवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 4:23 PM
नाशिक शहरात हिरावाडीतील कमलनगर परिसरात असलेल्या कृष्णा कॉम्प्लेक्स इमारतीसमोरच्या बाजूचे मोबाईल विक्री व दुरुस्ती दुकानाचे पत्रे उचलून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील रोकड तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल चोरी करून नेल्याची घटना गुरुवारी (दि.४) सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देनाशिक शहरात चोरट्यांचा सुळसुळाटहिरावाडीत मोबाईलचे दुकान फोडलेदुकान फोडून 77 हजारांचे मोबाईल लांबवले