नाशिक : मोबाईल, टॅब उशाशी ठेवून झोपण्याची सवय असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा मोबाईलच्या अशा वापरामुळे वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळून आरोग्यासाठी आवश्यक झोपेची जीवनभराची समस्या निर्माण होऊ शकते. मोबाईल फोन अनेकांचा स्लिपिंग पार्टनर झाला असल्याने मोबाईलशी अतिजवळीक करणं घातक असल्याचं अनेक उदाहरणांमधून समोर आले आहे.
. दिवसभर मोबाईलवर असणं, त्यानंतर रात्री झोपतानाही अनेकांची बोटं मोबाईलवरच फिरत असतात. एका सर्वेक्षणानुसार निम्म्याहून अधिक नागरिक मोबाईल फोन उशाशी किंवा हाताच्या अंतरावर ठेवून झोपतात. त्यापैकी काहीजण मोबाईल अलार्मसाठी म्हणून उशाशी ठेवतात, तर अनेकजण अर्ध्या रात्री झोप उडाली किंवा परत लागत नसेल तर मोबाईलवर टाईमपास करता येईल म्हणून अनेकांकडून मोबाईल जवळ ठेवला जात आहे.
इन्फो
झोपण्यापूर्वीची दक्षता
झोपण्याआधी किमान दोन तास मोबाईलचा वापर बंद करणे आवश्यक आहे. मोबाईलऐवजी गजर म्हणून घड्याळ वापरा. वेळेची मर्यादा ठरवून त्यानंतर मोबाईल चेक करणार नाही, असा नियम घालून घेणे आवश्यक आहे. मोबाईल वापरायचाच झाला तर घरातले लाइट्स लावून त्याचा वापर करा. चार्जिंगला फोन लावून झोपताना तो बेडपासून दूर ठेवावा. उशीखाली फोन ठेवल्यास तो तापण्यासह त्याचा स्फोट होऊ शकतो.
इन्फो
झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम
१. झोप कमी झाल्याने दिवसभर थकवा, आळस, डोकेदुखी जाणवणे
२. कोणत्याही कामात चित्त एकाग्र करणे अशक्य होणे
३. छोट्या कारणांंनीदेखील चिडचिड होणे, मनस्वास्थ्य नसणे
४. सततच्या जागरणाने अपचन, ॲसिडीटी यासह अनेक समस्या
५. डोळे कोरडे पडणं, लाल होणं, डोळ्यांवर झोप जाणवणे
इन्फो
डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच गोळी
कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला निद्रानाशाचा विकार असेल किंवा मध्यरात्र उलटूनही झोप न लागण्यासारखी समस्या असेल तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा कुणाच्या तरी उपलब्ध आहेत म्हणून गोळ्या घेऊ नयेत. विनाकारण गोळी घेणे शरीरासाठी घातक ठरू शकत असल्याने त्याबाबत दक्षता बाळगणे अत्यावश्यक आहे.
इन्फो
एक वर्षापर्यंतचे बाळ - किमान १६ तास.
१ ते ३ वर्षांपर्यंतचे बाळ- १२ ते १४ तास.
३ ते ६ वर्षांचे मूल- ११ ते १३ तास.
६ ते १० वर्षांचे मूल- १० ते ११ तास.
११ ते १८ वर्ष- ८ ते ९ तास.
मध्यम वयात- ८ तास.
६० वर्षांवरील ज्येष्ठ - ७ ते ८ तास
इन्फो
झोप का उडते
मोबाईल फोनमधून येणाऱ्या निळ्या उजेडामुळे रात्री तुम्हाला पहाटे झाल्याचा भास होतो. मोबाईल, टॅब यांच्या उजेडामुळे झोपेचा खोळंबा होऊन व्यक्तीची पूर्ण झोप होऊ शकत नाही. रात्र संपल्यानंतर आपल्या बंद डोळ्यांनाही आपसूक निळा उजेड दिसायला लागतो. त्यावेळी आपल्याला समजते की सकाळ होणार आहे. तसेच सायंकाळ होताना निळ्या रंगाच्या उजेडाच्या ऐवजी आपल्या लाल रंगाचा उजेड दिसतो. त्यानंतर मेंदू झोपण्याची तयारी करू लागतो. सायंकाळच्या लाल उजेडाचा संपर्क जेव्हा डोळ्यात अत्यंत खोल असलेल्या कोषिकांतील प्रोटीन मेलानोप्सीला झाल्याने माणूस झोपी जातो. उजेड जेव्हा या प्रोटीनच्या संपर्कात येतो तेव्हा कोषिका मेंदूत मास्टर क्लॉक तयार करते आणि संदेश प्रसारित करतात. त्यामुळे कधी झोपायचे आणि कधी उठायचे हे निश्चित होते. स्मार्ट फोनमुळे निळा उजेड पडतो त्यामुळे मेंदूला संदेश जातो की, पहाट झाली आहे. त्यामुळे गाढ झोप असताना अडथळा निर्माण होऊन जाग येते. त्यामुळेच रात्री झोपण्यापूर्वी स्मार्टफोन किंवा टॅब बंद केला पाहिजे किंवा तुमच्यापासून दूर ठेवणे आवश्यक आहे.
-------------------
ही डमी आहे.