इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून मोबाइलवर बोलत चालेल्या पादचाऱ्यांच्या हातातून मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न करीत पळ काढणाºया चोरट्यांच्या गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.१) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अमोल बाबूराव पाटील (२३ शिवपुरी चौक, अंबड) हे कंपनीच्या कामानिमित्त वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून मोबाइलवर बोलत जात असताना पाठीमागून दुचाकीवरून दोन अनोळखी इसम आले. त्यापैकी पाठीमागे बसलेले इसमाने त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला असता पाटील यांनी प्रतिकार करीत आरडाओरड केल्याने जवळच गस्त घालत असलेल्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश जगदाळे, दत्तात्रय पाळदे, संदीप लांडे, जावेद खान, त्यांनी दुचाकीवरील चोरट्यांचा कलानगर, राजसारथी सोसायटीमार्गे पाठलाग करून रथचक्र चौकातील एका प्लॉटमध्ये लपण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्यांच्या मुसक्या आवळल्या. या दोघाही चोरट्यांची पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. त्यानंतर प्रदीप सरबजीत थापा (१८) व त्याचा अल्पवयीन साथीदार अशा दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
इंदिरानगरमध्ये मोबाइल चोरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 10:03 PM