येवला : देशभरात मोबाइल विक्रीसाठी सात कोटींपेक्षा जास्त स्थानिक विक्रेते आहेत. मात्र, केंद्र सरकारने आॅनलाइन मोबाइल विक्रीला प्राधान्य देत स्थानिक विक्रेत्यांच्या पोटावर कुºहाड मारली आहे. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडील, एमआय आदी आॅनलाइन मोबाइल हँडसेट विक्री कंपन्यांच्या थेट विक्रीमुळे स्थानिक व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत. स्थानिक बाजारपेठेत ग्राहक मिळत नसल्याने काहींवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ आॅल इंडिया रिटेल असोसिएशन, येवला, मनमाड, निफाड व नांदगाव यांच्या वतीने येवला प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. तसेच निदर्शने करीत पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.येवला शहरातील विंचूर चौफुली येथे सर्व मोबाइल विक्रेत्यांनी एकत्र येत आॅनलाइन मोबाइल विक्रीवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली. तसेच काही काळ रास्ता रोको केला. त्यानंतर मोर्चा येवला प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. येवला, नांदगाव, मनमाड मोबाइल रिटेल असोसिएशनचे सुदर्शन खिल्लारे यांच्यासह येवला मोबाइल असोसिएशनचे अध्यक्ष अमोल भावसार, मनमाडचे राकेश ललवाणी, नांदगावचे केतन पारेख आदींनी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन देऊन व्यथा मांडल्या. या मोर्चात अमित बूब, अविनाश क्षत्रिय, नावेद शहा, बबलू लधानी, साईनाथ पवार, मुश्रीफ शहा, सागर वाणी आदी सहभागी झाले होते.निफाड येथे निदर्शनेनिफाड : तालुका मोबाइल रिटेलर असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसाचा संप करण्यात आला. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोबाइलची दुकाने बंद ठेवण्यात आली.आॅनलाइन कंपन्यांकडून दिली जाणारी प्रलोभने व आमिषांमुळे या कंपन्यांचे व्यवहार व व्यवसाय वाढले आहेत. त्याचा परिणाम स्थानिक सेल्समन, दुकानदार व कामगार अशांना बसत आहे. या क्षेत्राशी संबंधित असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ इंडिया मोबाइल रिटेलर असोसिएशनच्या वतीने एकदिवसीय बंद पाळत शासनाचे लक्ष वेधण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार योगेश शिंदे यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी वैभव चोरडिया, अलोक यादव, आशिष चोरडिया, दीपक दायमा, हरिष कापडी, संजय गाजरे, सोमनाथ वाघ, संतोष कातकाडे, नीलेश कायस्थ, गोरख लम्बोळे, योगेश कर्डिले, पंकज सुराणा, प्रवीण सानप, महेश चोरडिया आदी उपस्थित होते...या आहेत मागण्याआॅनलाइन व्यवसाय करताना या कंपन्या एफडीआयच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याने त्यावर कार्यवाही करावी, या कंपन्यांद्वारे होणारी आॅनलाइन विक्र ी बंद करा, नवीन मोबाइल लाँच होतो तो नवीन मोबाइल त्याचवेळी सर्व दुकानात उपलब्ध व्हावा, त्याची किंमत आॅनलाइन तसेच दुकानात सारखीच असावी, मिळणारा डिस्काउंटसुद्धा सारखा असावा, आॅनलाइन व्यवहारामध्ये ग्राहकाची फसवणूक होते त्याला आळा बसवावा आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
मोबाइल विक्रेते रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 10:56 PM
देशभरात मोबाइल विक्रीसाठी सात कोटींपेक्षा जास्त स्थानिक विक्रेते आहेत. मात्र, केंद्र सरकारने आॅनलाइन मोबाइल विक्रीला प्राधान्य देत स्थानिक विक्रेत्यांच्या पोटावर कुºहाड मारली आहे. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडील, एमआय आदी आॅनलाइन मोबाइल हँडसेट विक्री कंपन्यांच्या थेट विक्रीमुळे स्थानिक व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत. स्थानिक बाजारपेठेत ग्राहक मिळत नसल्याने काहींवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
ठळक मुद्देआॅनलाइन व्यापारास विरोध : येवला, निफाड येथे एकदिवसीय बंद