नाशिक : आगामी गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्णात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेनिहाय मॉकड्रिल सुरू करण्यात आले आहे़ दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल तसेच पोलीस ठाण्यातील प्रभारी व उपविभागीय अधिकारी यांचा या मॉकड्रिलमध्ये सहभाग आहे़दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलातील जवान व पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुकास्तरावर तसेच पोलीस मुख्यालय परिसरात कोम्बिंग आॅपरेशन तसेच दंगल नियंत्रणाची प्रात्यक्षिके केली जात आहेत़ याबरोबरच गोळीबार मैदानावर गोळीबाराचा सरावही करण्यात येत आहे़ यावेळी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपाधीक्षक सुरेश जाधव, अतुल झेंडे, सचिन गोरे, माधव पडिले, सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक अशोक करपे, मुख्यालयाचे राखीव पोलीस उपनिरीक्षक साहेबराव जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण पोलिसांचे मॉकड्रिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 11:35 PM
नाशिक : आगामी गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्णात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेनिहाय मॉकड्रिल सुरू करण्यात आले आहे़ दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल तसेच पोलीस ठाण्यातील प्रभारी व उपविभागीय अधिकारी यांचा या मॉकड्रिलमध्ये सहभाग आहे़
ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्था : गोळीबाराचा सराव