शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

मॉकड्रील : नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसवर अतिरेकी हल्ला होतो तेव्हा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 6:31 PM

अतिरेक्यांना ब्लॅक कॅट कमांडो आधुनिक शस्त्रांद्वारे चोख प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावतात. सुरक्षाव्यवस्था तपासण्यासाठी सुमारे चार तास रंगीत तालीमचा (मॉकड्रिल) हा भाग असल्याचे जाहीर केले जाते आणि प्रत्येकाचाच जीव भांड्यात पडतो.

ठळक मुद्देलढाऊ हेलिकॉप्टरद्वारे शंभर कमांडोंची तुकडी मुद्रणालयाच्या आवारात जवान आणि अतिरेक्यांमध्ये जोरदार चकमक

नाशिक : भारत प्रतिभूती मुद्रणालयावर काही समजण्याअगोदरच अतिरेक्यांकडून बॉम्बस्फोट व बेछूट गोळीबार सुरू झाल्याने सुरक्षेविषयी अ‍ॅलर्ट देणारा सायरन वाजतो अन् सीआयएसएफचे जवान तत्काळ प्रत्युत्तर देण्यास सज्ज होतात; मात्र अतिरेक्यांकडून जोरदार आधुनिक सामुग्रीद्वारे हल्ला केला जात असल्याने मोठे नुकसान होऊ नये, म्हणून तत्काळ केंद्र सरकारशी संपर्क साधून एनएसजी ब्लॅक कॅट कमांडोची (राष्ट्रीय सुरक्षा रक्षक) मदत मागितली जाते. अवघ्या अर्ध्या तासात लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे शंभर कमांडोंची तुकडी मुद्रणालयाच्या आवारात दाखल होते आणि अतिरेक्यांना ब्लॅक कॅट कमांडो आधुनिक शस्त्रांद्वारे चोख प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावतात. सुरक्षाव्यवस्था तपासण्यासाठी सुमारे चार तास रंगीत तालीमचा (मॉकड्रिल) हा भाग असल्याचे जाहीर केले जाते आणि प्रत्येकाचाच जीव भांड्यात पडतो.सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सरकारी दस्तऐवज मुद्रीत करण्याचे ठिकाण असलेले भारत सरकारचे भारत प्रतिभूती मुद्रणालयावर अतिरेक्यांनी रविवारी (दि.२६) हल्ला चढविला. हा हल्ला इतका भीषण होता की अतिरेक्यांनी थेट ग्रेनेडचा स्फोट घडवून आणाला. यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले. अतिरेक्यांकडे आधुनिक शस्त्रे असल्यामुळे त्यांनी बेछूट गोळीबार करण्यास सुरूवात केली. मुद्रणालयाच्या सुरक्षेसाठी असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्यांचा हल्ला थोपवून धरत प्रतिकार करण्यास सुरूवात केली; मात्र हल्ला भीषण स्वरूपाचा असल्याचे लक्षात येताच मुद्रणालय प्रशासनाने राज्य शासनाकडे एनएसजी कमांडोची मदत मागितली. राज्य सरकारकडून तातडीने केंद्राकडे याबाबत मागणी करण्यात येते आणि अवघ्या काही वेळेत १०० ब्लॅक कॅट कमांडो मुद्रणालयात हवाई मार्गे दाखल होतात आणि अतिरेक्यांवर हल्ला चढवितात. अत्याधुनिक शस्त्रास्त्राने सज्ज असलेल्या या जवान आणि अतिरेक्यांमध्ये जोरदार चकमक चालते. अखेर कमांडो अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यास यशस्वी होतात व ओलीस ठेवलेल्या कामगारांची सुरक्षितरित्या सुटका करतात.यावेळी एनएसजीचे कर्नल नितेश कुमार, सीआयएसफचे कमांडट के. के.भारव्दाज,राघवेंद्र सिंह, प्रेसचे महाव्यवस्थापक प्रसन्नकुमार साहू यांसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानcommandoकमांडो