नाशिक : मागील अनेक दिवसांपासून नाशिककर दमदार पावसाची प्रतीक्षा करत होते; मात्र पावसाने दडी मारल्यामुळे नाशिककरांना रेनकोट, छत्रीचा फारसा वापर करण्याची संधी जूननंतर मिळालीच नाही; मात्र गुरुवारी (दि.६) पहाटेपासूनच शहरात मध्यम सरींची संततधार सुरू राहिल्याने चाकरमान्यांना घराबाहेर पडताना रेनकोट, छत्रीचा आधार घ्यावा लागला. रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात १३.३ मिमी इतका पाऊस पडला.शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाला दमदार सुरुवात झाल्याने बळीराजासह सर्वच सुखावले आहे. मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने नागरिक हवालदिल झाले होते. हवामान खात्याकडून गुरुवारपर्यंत उत्तर-मध्य महाराष्टÑात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. दोन दिवस कोरडे गेले; मात्र गुरुवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे. सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात २४ मिमीपर्यंत पाऊस मोजला गेला. शहरातसुद्धा हलक्या व मध्यम सरींची संततधार सुरू असल्याने जनजीवन काहीसे प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा लाभला आहे.
प्रतीक्षेनंतर दिवसभर शहरात मध्यम सरींचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 1:17 AM
मागील अनेक दिवसांपासून नाशिककर दमदार पावसाची प्रतीक्षा करत होते; मात्र पावसाने दडी मारल्यामुळे नाशिककरांना रेनकोट, छत्रीचा फारसा वापर करण्याची संधी जूननंतर मिळालीच नाही; मात्र गुरुवारी (दि.६) पहाटेपासूनच शहरात मध्यम सरींची संततधार सुरू राहिल्याने चाकरमान्यांना घराबाहेर पडताना रेनकोट, छत्रीचा आधार घ्यावा लागला. रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात १३.३ मिमी इतका पाऊस पडला.
ठळक मुद्दे१३.३ मिमी पाऊस : नाशिककरांनी घेतला छत्री अन् रेनकोटचा आधार, मध्यरात्री पावसाला पुन्हा सुरुवात