नाशिक : तपोवन साधुग्राममध्ये सभेसाठी आलेल्या पंतप्रधना नरेंद्र मोदी सभा आटोपून पुढील प्रवासाला मार्गस्थ होत असल्यामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने हॅलिपॅडपर्यंत ‘कॅन्वॉय’चा मार्ग खुला अन्य वाहतूक रोखण्यात आली होती. याचवेळी नांदूरनाक्याच्या दिशेने एक रूग्णवाहिका सायरन सुरू करून आली असता नागरिकांची झालेली गर्दी आणि पोलिसांनी थांबविलेली वाहतूक यामुळे रूग्णवाहिकेचा खोळंबा झाला; मात्र सहायक आयुक्त मंगलसिंह सुर्यवंशी यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांना बाजूला करत काही युवकांची मदतीने रूग्णवाहिकेला तत्काळ मार्ग खूला करून देत प्रसंगावधान राखले.मोदी यांची सभा आटोपल्यानंतर साधुग्राममधून मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या हॅलिपॅडपर्यंत मोदी विशेष वाहनाने ‘कॅन्वॉय’द्वारे पोहचणार होते. ‘कॅन्वॉय पुढील काही मिनिटांत सुरू होत आहे, वाहतूक थांबवा...’ असा ‘मेजर कॉल’ शहर वाहतूक नियंत्रण शाखेला वायरलेसवरून झाला. तत्काळ स्वामीनारायण पोलीस चौकीच्या परिसरात सुर्यवंशी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहतूक थांबविली. द्वारकेकडे मुंबई-आग्रा महामार्गाने जाणारी वाहतूक, द्वारकेकडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक तसेच सभा आटोपून मुंबई-आग्रा महामार्गाकडे येणारी वाहतूक रोखली गेली. यासोबतच समांतर रस्त्याला जोडणारे अन्य उपरस्ते देखील पोलिसांनी बंद केले. याचवेळी नांदूरनाक्याकडून एक रूग्णवाहिका अत्यावश्यक सेवेत रूग्णला घेऊन जिल्हा रूग्णालयाकडे ‘सायरन’ देत धावत होती; मात्र वाहतूक रोखण्यात आल्याने रूग्णवाहिकेलाही चालकाने ‘ब्रेक’ लावला. सायरनचा आवाज मात्र सुरूच असल्याने सुर्यवंशी यांनी प्रसंगावधान राखत रूग्णवाहिकेच्या जवळ धाव घेत चालकाला सुचना केली आणि दोरखंड काही युवकांच्या मदतीने बाजूला करून कॅन्वॉय येण्यास दोन मिनिटे शिल्लक राहिले असताना रूग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
मोदींच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवली, तेव्हाच अॅम्ब्युलन्स आली; अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 6:04 PM
साधुग्राममधून मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या हॅलिपॅडपर्यंत मोदी विशेष वाहनाने ‘कॅन्वॉय’द्वारे पोहचणार होते. ‘कॅन्वॉय पुढील काही मिनिटांत सुरू होत आहे, वाहतूक थांबवा...’ असा ‘मेजर कॉल’...
ठळक मुद्देरूग्णवाहिकेलाही चालकाने ‘ब्रेक’ लावला.रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केलाप्रसंगावधान राखत रूग्णवाहिकेच्या जवळ धाव