जानोरी : मोहाडी येथील द्राक्ष उत्पादकाने विद्यालयाला दिलेल्या ठेवीच्या व्याजातून पहिली ते बारावीत प्रथम व दुतीय क्र मांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास दरवर्षी बक्षीस व प्रत्येक विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातोसमाजकार्याचा वसा जोपासणाºया एकनाथ कळमकर यांचा समाजाने आदर्श घ्यावा असे मत कादवा कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी यांनी व्यक्त केले. कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालयाच्या सहकार्याने पहिली ते बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते.माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जाधव, स्कुल कमिटी अध्यक्ष विलास पाटील, शरद ढोकळे, मंडळ अधिकारी दौलत गणोरे, पंढरीनाथ कळमकर आदींच्या हस्ते रोख रक्कम देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.यावेळी सुदाम पाटील, नंदकुमार डिंगोरे, वसंत देशमुख, अनिल निकम, बाजीराव देशमुख, बबन जाधव, धनंजय वाणले, पुंडलीक कळमकर, सोमनाथ कळमकर, शिवाजी नाठे, शांताराम संधान, सुनील कळमकर आदी उपस्थित होते. प्राचार्य विजय म्हस्के यांनी प्रास्तविक केले. रामनाथ गडाख, तुषार गीते यांनी सूत्रसंचालन केले. शरद निकम यांनी आभार मानले.थोरात विद्यालयात बुधवारी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवर. (१६ जानोरी)
मोहाडीला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 3:44 PM
जानोरी : मोहाडी येथील द्राक्ष उत्पादकाने विद्यालयाला दिलेल्या ठेवीच्या व्याजातून पहिली ते बारावीत प्रथम व दुतीय क्र मांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास दरवर्षी बक्षीस व प्रत्येक विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो
ठळक मुद्देअनोखा उपक्र म : बँकेत ठेवीच्या पैसाच्या व्याजाच्या पैसाने बक्षीस वितरण