नाशिकरोड : एकलहरेग्राम-पंचायतीच्या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचपदी ग्रामविकास पॅनलच्या मोहिनी संदीप जाधव विजयी झाल्या आहेत. तर सदस्यांच्या १७ जागांमध्ये ग्रामविकास पॅनल ७ व परिवर्तन ग्रामविकास पॅनल १० जागांवर विजयी झाले आहे. सरपंच पदावर विजय मिळविल्याने ग्रामविकास पॅनलची सत्ता आली आहे. एकलहरे ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. तहसील कार्यालयात सरपंच पदाच्या मतमोजणीमध्ये ४७२० मतदानापैकी ५२ मतदारांनी नोटाचे मत दिले. ग्रामविकास पॅनलच्या मोहिनी संदीप जाधव २५०६ मते मिळवून विजयी झाल्या. तर भाजपा पुरस्कृत परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या सुजाता दिलीप पगारे यांना २१६२ मते मिळाली. वॉर्ड १ मधून ग्रामविकास पॅनलचे विश्वनाथ होलीन (८९०), निर्मला इंगळे (९२४), रूपाली कोकाटे (१०५९), वॉर्ड २ मधून नीलेश धनवणे (३०४), कांताबाई पगारे (२४७), वॉर्ड ३ मधून परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे श्रीराम नागरे (४०८), जयदेव वायदंडे (३९७), शोभा म्हस्के (४१७), वॉर्ड ४ मधून अशोक पवळे (५५४), मुक्ता दुशिंग (५५६) व ग्रामविकास पॅनलच्या सुरेखा जाधव (५८४) मते मिळवून विजयी झाल्या. वॉर्ड ५ मधून परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या निर्मला जावळे (२१६), शोभा वैद्य (२१६), रत्नाबाई सोनवणे (१८७), वॉर्ड ६ मधून ग्रामविकास पॅनलच्या वैशाली धनवटे (२५०), परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे सुरेश निंबाळकर (१९०), संजय ताजनपुरे (२३९) मते मिळवून विजयी झाले.
एकलहरेच्या सरपंचपदी मोहिनी जाधव विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:32 AM