शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

मोहिते, शेख यांना ‘पोलीस पदक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:25 AM

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला शुक्रवारी (दि़२५) पोलीस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील ४४ पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

नाशिक : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला शुक्रवारी (दि़२५) पोलीस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील ४४ पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.  शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जाकिर हुसेन गुलाम हुसेन शेख यांना गुणवत्तापूर्ण सेवेबाबत पोलीस पदक जाहीर झाले आहे़ जाकिर शेख हे १९८५ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते़ प्रारंभी व्हॉलीबॉल व कराटे प्रशिक्षणामध्ये त्यांनी नैपुण्य प्राप्त केले़ सिन्नर, देवळाली कॅम्प, नाशिकरोड, पंचवटी पोलीस ठाणे तसेच शहर गुन्हे शाखेत कर्तव्य केले़ टिप्पर गँग, इराणी गँग, चोरी, घरफोडीतील सराईतांना त्यांनी अटक करून गुन्हे उघडकीस आणले़ ३३ वर्षांच्या सेवेतील कालावधीत जाकिर शेख यांनी ४५० बक्षिसे मिळविली.भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास रघुनाथ मोहिते यांना गुणवत्तापूर्ण सेवेबाबत पोलीस पदक जाहीर झाले आहे़ १९८३ मध्ये पोलीस शिपाई या पदावर भरती झाले़ मालेगावमधील छावणी पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस उपअधीक्षक कार्यालय, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिकरोड पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय, गुन्हे शाखा, सरकारवाडा, सिंहस्थशाखा व भद्रकाली पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत़ ३६ वर्षांच्या सेवेतील कालावधीत विलास मोहिते यांनी २३० बक्षिसे मिळविलेली आहेत़यावर्षी देशभरातून ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक (पीपीएमजी), १४६ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी), ७४ पोलिसांना उत्कृष्ट सेवा ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएमडीएस ) आणि ६३२ पोलिसांना ‘पोलीस पदक’(पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख व सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास मोहिते यांना पोलीस पदक जाहीर झाले आहेत़

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय