नाशिक : शहरासह जिल्ह्यात गांजा तस्करीचे रॅकेट चालविणाºया संशयितांविरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे़ या कारवाईमुळे शहरातील गांजा तस्करीबरोबरच अमलीपदार्थ विक्रीचे रॅकेट नष्ट होण्यास मदत होणार आहे़आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवन शिवारात लक्ष्मीनारायण मंदिराजवळ शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़११) सापळा रचून एका आयशर ट्रकमधून ३५ लाख रुपये किमतीचा ६८० किलो गांजा जप्त केला होता़ यानंतर सिन्नर तालुक्यातून ३९० किलो असा केवळ दोनच दिवसांत १ टन ७० किलो गांजा जप्त करण्यात आला़ या कारवाईमुळे शहरात गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी तसेच विक्री केली जात असल्याचे समोर आले़ याप्रकरणी आडगाव परिसरातून दोन, तर सिन्नरमधून एका संशयितास अटक करण्यात आली़ पोलिसांनी या तिघा संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर ओडिसा येथून गांजा पुरवठा होत असल्याचे समोर आले़ यानंतर पोलिसांनी ओडिसामधून गांजा पाठविणाºया सप्लायर्सलाही अटक केली़ केवळ नाशिक शहरच नव्हे तर धुळे, नागपूर, जळगाव यांसह राज्यभरात गांजा पाठविला जात असल्याचे समोर आले आहे़
गांजाची तस्करी करणाऱ्यांविरोधात मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:30 AM