नाशिकरोड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेलरोड नारायणबापूनगर चौकात बुधवारी दुपारी पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रक्षुब्ध जमाव पांगविण्यासाठी मॉकड्रील घेण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार मॉकड्रिलचे सोपस्कार पार पाडण्यात आले. मात्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गांभीर्य नव्हते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेलरोड नारायणबापूनगर चौकात बुधवारी दुपारी सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी मॉकड्रिल घेण्यात आले. प्रारंभी पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस व मोठ्या संख्येने आलेली वाहने बघून येणाऱ्या-जाणाºयांना काय झाले याची उत्सुकता लागली होती. मात्र थोड्याच वेळात पोलीस अधिकाºयांनी पुरुष व महिला पोलिसांकडून प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी संरक्षक फायबर काचेच्या मदतीने मॉकड्रिल व प्रात्यक्षिक करून घेतले.वेळेचा अपव्ययवरिष्ठांच्या आदेशानुसार मॉकड्रिलचे सोपस्कार पार पाडण्यात आले. मात्र यामध्ये कुठल्याही प्रकारचे गांभीर्य दिसून आले नाही. यामुळे मात्र पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या वेळेचा अपव्यय झाल्याचे चित्र दिसत होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोडला मॉकड्रिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:45 AM