नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून इंडिका मोटार, तर पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकीचोरी करून त्याच रात्री सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानावर दरोडा टाकून आडगाव शिवारात सराफाचे दुकान फोडणारे कुख्ख्यात दरोडेखोर सराईत आहेत. या टोळीच्या म्होरक्या हरदीपसिंग बबलू टाकविरुद्ध (रा. अहमदनगर) विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे ३९ गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदाअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.नियोजनबद्ध पद्धतीने एकाच रात्री दरोड्याची तयारी करून दोन ठिकाणी दरोडा टाकणे, वाहनचोरी करणे असे एकूण चार गुन्हे करणारे हे दरोडेखोर सराईत गुन्हेगार आहेत. यामध्ये एक संशयित नाशिकचा जावई असून, एक जालना व दुसरा अहमदनगरचा रहिवासी आहेत. हरदीपसिंग टाक हा या टोळीचा म्होरक्या असून, याच्यावर जबरी लूट, दरोडे, दरोड्याची तयारी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसह एकूण ३९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. त्याने नाशिकच्या गंजमाळ भागात राहणाऱ्या अमनसिंग टाकच्या साथीने शहरातील आडगाव व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील सायखेडा भागात दुकाने फोडून जबरी लूट केली. पोलिसांच्या तावडीतून निसटण्यासाठी गस्त पथकावर त्यांच्यापैकी एकाने गावठी कट्ट्यातून एक राउंड फायर केला त्यास प्रत्युत्तर म्हणून उपनिरीक्षक धैर्यशील घाडगे यांनी सर्विस रिव्हॉल्वरद्वारे बचावासाठी एक राउंड फायर केला. यावेळी पळून जाणा-या दरोडेखोरांपैकी लखनच्या (पूर्ण नाव, पत्ता समजू शकला नाही) पायावर गोळी लागल्याचे घाडगे म्हणाले. मात्र अद्याप तो पोलिसांच्या हाती लागला नसून त्याला ताब्यात घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल, असे नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले.---गस्त पथकाला ३५ हजारांचे बक्षीसरात्रीची चोखपणे गस्त घालत कुख्यात सराईत गुन्हेगारांचा पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धैर्यशील घाडगे व त्यांच्या पथकाला नांगरे-पाटील यांनी विशेष प्रमाणपत्र व ३५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरव केला. गस्त पथकाचे प्रसंगावधान, तत्परता व धाडसामुळे गुन्हेगार हाती लागल्याचे ते म्हणाले.
गोळीबार करणाऱ्या दरोडेखोरांवर ‘मोक्का’ लावणार : विश्वास नांगरे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 6:09 PM
रात्रीची चोखपणे गस्त घालत कुख्यात सराईत गुन्हेगारांचा पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धैर्यशील घाडगे व त्यांच्या पथकाला नांगरे-पाटील यांनी विशेष प्रमाणपत्र व ३५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरव केला.
ठळक मुद्देगस्त पथकाला ३५ हजारांचे बक्षीसहरदीपसिंग टाक हा या टोळीचा म्होरक्या