दिंडोरी : नववर्षाच्या प्रारंभी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील म्हेळुस्के येथे नरभक्षक बिबटयाला पकडण्यात अखेर वनविभाला यश आले आहे. म्हेळुस्के येथील श्रीरंग खिरकाडे या तीन वर्षीय बालकाचा मागील चार महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात झालेला मृत्यू व अधुन-मधून बिबट्याचे होणारे दर्शन या पाशर््वभूमीवर नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने परिसरात वेगवेगळ्या अशा तीन ते चार ठिकाणी पिंजरे लावले होते.परंतु चार महिने उलटूनही बिबट्या पिंजºयात अडकला जात नसल्याने वनविभागाच्या कर्मचाºयांनी जगताप व मेधने वस्तीलगत लावलेला पिंजरा तसाच ठेवत बाकीचे पिंजरे घेऊन गेले. सोमवारी सकाळी येथील शेतकरी मनोज मेधने आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी जात असतांना अचानक काहीतरी गुरगुरन्याचा आवाज आला म्हणून बघितले तर आतमध्ये बिबट्या अडकलेला दिसला. ही बातमी मनोज याने सुनील जगताप व जवळच गव्हाला पाणी देत असलेले तुकाराम गांगोडे यांना सांगितली.बिबट्या पिंजºयात अडकल्याची बातमी वाºयासारखी गावात पसरल्याने बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याने काही विपरीत घटना घडू नये याकरिता वनविभागाच्या कर्मचाºयांनी तात्काळ घटनास्थळी येऊन बिबट्याला बंदोबस्तात वणी येथील वनविभाग परिक्षेत्रात घेऊन गेले. लखमापूर, म्हेळुस्के, परमोरी, अवनखेड परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत होती. म्हेळुस्के व लखमापूर येथे दोन बालकांचा बळी बिबट्याने घेतला होता वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने डझनभर पिंजरे लावले होते.तसेच कॅमेरे ही लावण्यात आले होते.वनविभाग कर्मचारी थेट पिंजर्यात बसत बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र बिबट्या पिंजर्यात येत नसल्याने नागरिक दहशती खाली होते म्हेळुस्के येथे एक बिबट्या पकडल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी कादवा नदी परिसरात अजूनही बिबटे यांचा वावर असून सर्व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
म्हेळुस्केतील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 2:18 PM