नाशिक : शहरातील कॅनडाकॉर्नर परिसरात राहणाऱ्या एका महिलेकडून बळजबरीने खंडणी वसूली करण्यासाठी तीच्या संपत्तीचे बनावट कागदपत्रे बनवून भीती दाखवत महिलेला धक्काबुक्की करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयितांवर खंडणी वसूलीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिडित महिलेच्या पतीचे अपघाती निधन झाले. त्यानंतर संशयित जयेश कृष्णाकांत पारखे, आशा जयेश पारखे (रा.नयनतारा हाईटस्, मायकोसर्कल) या दाम्पत्यासह सुरेश वैश्य (रा.सावरकरनगर गंगापूररोड) यांनी संगनमत करून खंडणी वसूलीसाठी दबाव वाढविला. पतीला मृत्यूपुर्र्वी एक कोटी रूपये दिल्याचे पिडितेला सांगितले. त्या बदल्यात पिडित फिर्यादी महिलेच्या पती यांनी सदनिका, जळगाव येथील शेती या जागेचे बनावट नोटरी कागदपत्रे तयार करून घेत त्याची सत्यप्रत (झेरॉक्स) दाखवून पिडितेच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जानेवारी २०१८पासून आतापर्यंत या संशयितांनी सातत्याने दबाव वाढवून पिडितेचा वारंवार पाठलाग करत पारखे दाम्पत्याने कॅनडाकॉर्नर येथे पिडित महिलेचे वाहन रोखले. यावेळी दोघांनी मिळून पिडितेला धक्काबुक्की करत लज्जा उत्पन्न होईल, अशाप्रकारचे कृत्य करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच एक कोटी रूपये न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली, अशा तक्रारही पिडित महिलेने फिर्यादीतून केली आहे.याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी पिडितेच्या फिर्यादीवरून तीघा संशयितांविरूध्द खंडणी वसूली, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास उपनिरिक्षक योगीता नारखेडे या करीत आहेत.
एक कोटीच्या खंडणीसाठी एका दाम्पत्याकडून महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 2:10 PM
जानेवारी २०१८पासून आतापर्यंत या संशयितांनी सातत्याने दबाव वाढवून पिडितेचा वारंवार पाठलाग करत पारखे दाम्पत्याने कॅनडाकॉर्नर येथे पिडित महिलेचे वाहन रोखले. यावेळी दोघांनी मिळून पिडितेला धक्काबुक्की करत लज्जा उत्पन्न होईल, अशाप्रकारचे कृत्य करून शिवीगाळ
ठळक मुद्देजीवे ठार मारण्याची धमकी तीघा संशयितांविरूध्द खंडणी वसूली, विनयभंगाचा गुन्हा