पेठ : प्रत्येकाच्या आयूष्यात सर्वाधिक आठवणीत असणारा दिन म्हणजे शाळेचा पाहिला दिवस! या विषयांवर निबंध लिहीताना प्रत्येकानेच आपल्या लेखनीतून रेखाटलेला तो शाळेचा दिवसच उजाडला नाही तर निबंध तरी कसा लिहीणार? या द्विधा मनिस्थतीत असणारे चिमुकले आईकडे ’आई मला शाळेला जायचयं .. जाऊ दे ना वं’ असा हट्ट करु लागल्याचे चित्र दिसून येत आहे.कोरोनाचे संकत आले नसते तर दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2020-21 चा पहिला दिवसही दि.15 जून राहिला असता. मात्र, यंदा हा दिवस शाळांमध्ये सुनासुना जाणार असून शिक्षक, विद्याथी व पालकांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे.-----------------पहिला दिवस प्रथमच सुनासुनागत तीन महिन्यनंपासून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शाळा- महाविद्यालये बंद करण्यात आली असली तरी शाळा व मित्रांपासून दुरावलेल्या मुलांना शाळेची ओढ लागली आहे. कितीही आॅनलाईन शिक्षणाच्या पध्दती अवलंबल्या तरी प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. खर्या अर्थाने जीवन शिक्षण देणार्या शाळाचा पहिला दिवस प्रथमच सुना सुना गेला.-----------------आॅनलाईन शिक्षणात अडचणीएकीकडे शासनाकडून शाळा बंद, शिक्षण सुरू अशा प्रकारचे धोरण आणले जात असले तरी ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर कोणत्याही प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा नसतांना आॅनलाईन शिक्षणात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे कोरोनामुळे पालकांना आपल्या कुटुंबाचा चिरतार्थ भागवणे अवघड झाले आहे, तेथे इंटरनेट सारखी साधने कशी उपलब्ध होतील हा प्रश्न पालकांसमेर उभा ठाकला आहे.----------------------आम्हाला खुप दिवसांपासून घरी बसून कंटाळा आला आहे. लवकर कोरोना जाऊ दे आणि आमची शाळा पुन्हा आधी सारखीच भरू दे अशीआम्ही देवाला प्रार्थना करतो. शाळेतल्या मित्रांची व सरांची खुप आठवण येते. फोनवर बोलतो पण भेटी होत नाही.- दीपाली हिंडे, विद्यार्र्थिनी
आई मला शाळेला जायचंय... जाऊ दे ना वं..!; पेठमधील चिमुकल्यांना लागली शाळेची ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 9:05 PM