संगमेश्वर : पल पल दिल के पास, तुम रहती हो पासून ते हा तुम मुझे यु भुला ना पाओगेपर्यंत विविध जुन्या गीतांची मैफल उत्तरोत्तर रंगतच गेली. निमित्त होते, कोरोना काळात नागरिक त्रस्त असताना त्यापासून मुक्तीसाठी. येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेने शहर व तालुक्यातील ज्येष्ठांसाठी जुन्या काळातील फिल्मी गीतांच्या कार्यक्रमाचे. मालेगाव शहरातील पाच प्रसिद्ध गायक निवडून त्यांना प्रत्येकी पाच पाच गाणी जुन्या काळातील म्हटली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते पी. टी. वाघ होते . याप्रसंगी अमृता कुंभकर्ण यांनी बाबूजी धीरे चलना ,बैया ना धरो, चांद फिर निकला, तेरे बिन जिंदगी मे ही गीते म्हटली. तर सुप्रसिद्ध सराफ एम. बी. राजदार यांनी, मेरे मेहबूब कयामत होगी, एक दिन बिक जायेगा, जिंदगी का सफर है ये कैसा सफर, प्यार दीवाना होता है तर सेवानिवृत्त पोस्टमास्टर किशोर महाजन यांनी जग हे बंदी शाळा, तुझे सुरज कहू या चंदा, दिवस तुझे हे फुलायचे, तर ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते सुनील वडगे यांनी जो तुमको हो पसंद वही बात करेंगे, छू लेने दो नाजूक होटो को, हा तुम मुझे यु भुला ना पाओगे, पल पल दिल के प्यास, तर युवा गायक कुंदन चव्हाण यांनी कभी कभी मेरे दिल में, प्यार दीवाना होता है ही गीते गायली. त्यांनी ज्येष्ठांना आपल्या तारुण्याच्या काळात नेले. पी. टी. वाघ म्हणाले की, कोरोना काळात ज्येष्ठ नागरिक संस्थेने हा स्तुत्य उपक्रम केला आहे. कार्यकारिणी सदस्य शालिनी डहाळे, सौ. नलिनी माळी, सुरेश गरुड, जे. डी. हिरे प्रकाश कांकरिया आदींनी प्रयत्न केले. निंबाजी सूर्यवंशी यांनी गीत म्हटले व आभार प्रदर्शन केले.
पल पल दिल के प्यास, तुम रहती हो..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:11 AM