मुंबई - आग्रा महामार्गावरील गेल्या दोन महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. या खड्ड्यांमुळे नाहक जीव जात होते. बहुतांश नागरिक अधू झाले. दररोज गाड्या नादुरुस्त होत होत्या. वाढत्या खड्ड्यांमुळे महामार्गाची चाळण झाल्याने वाहन चालकांचे कंबरडे मोडले होते. कसारा घाट ते वाडीवऱ्हे दरम्यान रस्त्यावरील खड्डे डोकेदुखी बनली होती. इगतपुरी तालुका हद्दीतील झालेल्या ह्या खड्ड्यांकडे हेतुपुरस्सररित्या डोळेझाक केल्या जात असल्याचे निदर्शनास येत होते. या महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या टोल प्रशासनाने कुठल्याही उपयोजना आखल्या नसल्याने त्या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्या पार्श्वभूमीवर आता रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
महामार्गावरील खड्डे, दिशादर्शक फलक, दुभाजकावरील वाढलेली झाडे, स्पीडब्रेकर, व्हाईट साईड पट्टी, साईडपट्ट्या मजबूत करणे, वळणे, धोकादायक ठिकाणे व अपघातग्रस्त ठिकाणी सूचनाफलक लावणे, उताराच्या व वळणाच्या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करणे, धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने विविध ठिकाणी रेडियम लाईट अशा विविध आवश्यक बाबींची प्रशासनाने पूर्तता केल्यास भविष्यातील अपघात कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
----------------------
या ठिकाणी उपाययोजनांची गरज
महामार्गावरील वाडीवऱ्हे बायपास, गोंदे फाटा, रोठे कंपनीसमोरील पूल, पाडळी फाटा, जिंदाल पूल, मुंढेगाव फाटा, माणिकखांब येथील दोन वळणमार्ग, रेल्वे पूल,सिन्नर फाटा ते टोल नाका, बोरंटेभे फाटा, इगतपुरी बायपास रेल्वे पूल, इगतपुरी बायपास ही अपघाताची क्षेत्र बनले आहेत. याठिकाणी उपाययोजनांची गरज आहे.
फोटो- २६ महामार्ग वर्क-१
260921\26nsk_16_26092021_13.jpg
फोटो- २६ महामार्ग वर्क-१