चौकट-
काय आहे या दोन हजारांच्या किटमध्ये
वस्तू स्वरुपात देण्यात येणाऱ्या अनुदानाचे एक कि. तयार करण्यात आले असून, या किटमध्ये मटकी १ किलो, चवळी २ कि., हरभरा ३ कि., पांढरा वाटाणा १ कि. तूरडाळ २ कि., उडीद डाळ १ कि., साखर- ३ कि., मीठ ३ कि., गरम मसाला, मिरची पावडर व चहा पावडर प्रत्येकी ५०० ग्रॅम, तर शेंगदाणा तेल १ लिटर अशा एकूण १२ वस्तू आहेत.
चौकट-
वाटपाचा घोळ कायम
आदिवासी भागातील लाभार्थींपर्यंत या किटचे वाटप करायचे कसे, याचा घोळ अद्याप सुरूच आहे. स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत याचे वाटप व्हावे असे आदिवासी विकास महामंडळाचे प्रयत्न आहेत. याबाबत अन्न आणि नागरी पुरवठा विभागाशी त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांकडे आधीच शासनाच्या विविध योजनांच्या धान्य वाटपाचे काम असताना हे नवीन काम द्यायचे किंवा नाही याबाबत विचार सुरू असून, राज्य शासनाने घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण केले जात आहे. याचा निर्णय होईपर्यंत प्रकल्पस्तरावरून कामकाजास सुरुवात करण्यात आली आहे .
कोट-
खावटी योजनेतील किराणा वाटपाच्या कामास प्रारंभ झाला असून, प्रथम दुर्गम भागातील गाव, पाडे किंवा जेथे पावसामुळे संपर्क तुटण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी प्रथम वाटपाचे काम पूर्ण केले जाणार आहे. तळोदा, अहेरी, गडचिरोली, भामरागड, धारणे या प्रकल्पांना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. स्वस्त धान्य दुकानांमार्फत याचे वाटप केल्यास दुकानदारांनाही उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होणार आहे. पाच किट वाटप केल्यानंतर दुकानदारांना १५० रुपये मिळणार आहेत.
- नितीन पाटील, व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ