अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार यापूर्वी नोंदणी करीत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येत आहे. यात महाविद्यालयांचा पसंतीक्रम व शाखा निवडीकरिता अर्जाचा भाग दोन असल्याने, या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
नाशिक शहरातील ६० महाविद्यालयांतील अकरावीच्या २५ हजार ३८० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शुक्रवारी (दि.२०) सायंकाळपर्यंत १९ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १६ हजार ६५७ विद्यार्थ्यांचे अर्ज लाॅक झाले आहे. नोंदणीकृत १६ हजार ५७ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी झाली आहे, तर ११ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन, अर्थात पसंती क्रमांक नोंदविला आहे.
चौकट
अकरावी प्रवेशाची सद्यस्थिती
महाविद्यालये- ६०
जागा- २५, ३८०
नोंदणी- २०, १९७
लॉक अर्ज- १७,१५२
पडताळणी- १६,४०३
भाग दोन - १२,३००