केंद्र सरकारचे हे कायदे शेतकरी विरोधी आहेत. शेतकऱ्यांना शेतमजूर बनवणारे व भूमिहीन बनवणारे आहे तसेच उद्योगपतींच्या घशात शेती देणारे आहेत. वीज बिल कायदा प्रस्तावित शेतकरी विरोधी व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सवलती हिसकावून घेणारा आहे. प्रचंड पेट्रोल, डिझेल दरवाढ झाली आहे. या विरोधात नाशिक जिल्ह्याच्या वतीने नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचे नियोजन करण्यासाठी सोमवार दि. १६ रोजी सकाळी ११ वाजता नाशिकरोड सिन्नर फाटा कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजारतळ येथे नियोजन बैठक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कायद्याला विरोध असणारे आजी माजी लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन बहुजन शेतकरी संघटना, किसान सभा, अखिल भारतीय किसान सभा, किसान काँग्रेस, नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
ट्रॅक्टर रॅली नियोजनाची सोमवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:17 AM